ईशान्य भारताच्या विजयाचा सोनपेठ येथे विजयोत्सव साजरा
सोनपेठ(राजेश खेडकर)गेली २५वर्षाची त्रिपुरातील मार्क्सवाद्यांची सत्ता भजपाने हुसकावुन लावल्याबद्दल व नागालँडमध्ये भाजपाचे मोठ्या प्रमाणात कमळ फुलल्यामुळे सोनपेठ भाजपाच्या वतीने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करन्यात आला. यावेळी बोलतांना भाजपा ज्येष्ठ नेते रमाकांतदादा जहागीरदार यांनी यावेळी बोलतांना, त्रिपुरा व नागालँड या राज्यात काँग्रेसची फारच वाईट अवस्था झाली आहे. देशातील एकुण २२ राज्यात भाजपा व मित्रपक्षाचे सरकार असुन काँग्रेसचे व मित्रपक्षाचे केवळ ०४राज्यात सरकार आहे. तर, भाजपाने घेतलेल्या जनहिताच्या निर्णयाचे व कार्याचे हे यश असल्याचे मत परभणी जिल्हा चिटणीस शिवाजी मव्हाळे यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते रमाकांतदादा जहागीरगार, जिल्हा चिटणीस शिवाजी मव्हाळे, पत्रकार बाबासाहेब गर्जे, युसुफ चौधरी, मिनाताई सावंत, विश्वनाथ दराडे, शेख बासद, संतोष दलाल कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें