घोटाळा प्रकरण= लालू प्रसाद यांना 7 वर्षांचा कारावास, आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 मार्च 2018

घोटाळा प्रकरण= लालू प्रसाद यांना 7 वर्षांचा कारावास, आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षा.

घोटाळा प्रकरण= लालू प्रसाद यांना 7 वर्षांचा कारावास, आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षा.


घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना  सीबीआयच्या विशेष  न्यायालयाने 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबत, 30 लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. चार घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणात मिळून लालू प्रसाद यादव यांना 20 वर्ष 6 महिन्यांची शिक्षा झाली आहे. लालू प्रसाद यादव यांनी सोमवारी (19 मार्च) रांची न्यायालयाने चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणात दोषी ठरवले होते. या सुनावणीदरम्यान 12 जणांना दोषी ठरवण्यात आले होते तर 19 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

लालू प्रसाद यादवांवर अवैधरित्या रक्कम काढल्याचा आरोप.. लालू प्रसाद यादव यांच्यावर झारखंडमधील दुमका येथील कोषागारातून अवैधरित्या 3 कोटी 13 लाख रुपये काढल्याचा आरोप करण्यात आला होता. चारा घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर करण्यात आलेला हा चौथा आरोप आहे. यावरील सुनावणी 5 मार्चलाच पूर्ण झाली होती. मात्र, लालूंच्या वतीनं वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिकांमुळं त्यावरील निर्णय रखडला गेला होता. अखेर 19 मार्चला यावर निर्णय झाला व त्यांना दोषी ठरवण्यात आले. लालू प्रसाद यांच्यावर डिसेंबर 1995 ते जानेवारी 1996 दरम्यान दुमका कोषागारमधून 3.13 कोटी रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप आहे.

चारा घोटाळ्याच्या पहिल्या प्रकरणी लालूंना 2013 मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दुस-या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवत 23 डिसेंबर 2017 रोजी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणात न्यायालयाने 24 जानेवारी 2018 ला लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालूप्रसाद यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें