शेतकऱ्यांच्या कापसाला पडलेल्या बोंडअळीमुळे त्यांना नुकसान भरपाई द्या- आ.मोहन फड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 15 मार्च 2018

शेतकऱ्यांच्या कापसाला पडलेल्या बोंडअळीमुळे त्यांना नुकसान भरपाई द्या- आ.मोहन फड

शेतकऱ्यांच्या कापसाला पडलेल्या बोंडअळीमुळे त्यांना  नुकसान भरपाई द्या- आ.मोहन फड

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१५: पाथरी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या  कापसाला बोडअळी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले असुन त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यंमंञी देवेन्द्र फडणविस यांच्याकडे दि.१४ मार्च रोजी निवेदनाद्वारे पाथरी विधानसभाचे आमदार मोहन माधवराव फड यांनी केली आहे.
मुख्यमंञी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पाथरी मतदारसंघातील मानवत,पाथरी ,सोनपेठ व परभणी जिल्हयातील कापुस उत्पादक शेतकरी चे बोडअळीच्या प्रार्दुभावाने ग्रासलेल्या पिकाचे सर्वेक्षणअती गावनिहाय बोडअळी ने नुकसान झालेल्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे याद्या जिल्हास्तरावर उपलब्ध आहे सदरील प्रकरणात पिक कापणीच्या प्रयोगाचे  निष्कर्ष चा आधार घेऊन जिल्हयातील ८५२ गावापैकी १०० गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास पाञ ठरविले आहे बोंडआळीच्या प्रार्दुभावाने नष्ट झालेल्या कापुस पिकाच्या नुकसानी बाबत मिळणाऱ्या आर्थीक मदतीपासुन कापुस उत्पादक वर्गास वंचित ठेवल्यामुळे ईतर गावातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे बोंडआळीमुळे कापसाची नुकसान झाली असुन या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदनात नमुद केले आहे.

Tezznews24 web news channel.

Contact.no.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें