सोनपेठ येथे रामनवमी, हिंदु एकता दिवसानिमीत्त भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न.
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२७मार्च २०१८
शहरात सकाळच्या सत्रात श्री राम मंदिर येथे रामकथा, पुजन, महाआरती व महाप्रसाद करण्यात आले व दुपारी ठीक ५.३० वा. १०८ शिवाचार्य नंदिकेश्वर महाराज यांच्या हस्ते पालखी पुजन करून मार्गस्थ करण्यात आली प्रसंगी मोठ्या संख्येत हिंदू धर्म प्रेमी, स्वयंसेवक, व विविध हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते, सहकारी पत्रकार बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते, मिरवणूकीत मुक्तेश्वर ढोल पथक, सजीव प्रभु श्री राम, हनुमान, सीता, व ९ फुट उंचीची भव्य प्रभु रामाची मुर्तीने सोनपेठकरांचे विशेष आकर्षण राहीले
या महोत्सवाचे सर्व श्रेय आयोजक, संयोजक, नियोजक
सार्वजनिक श्री राम जन्मोत्सव समिती सोनपेठ मधील सदस्य, रामभक्तांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें