आपलं ठेवा झाकून अशी गत महावितरनाची
महावितरणच्या थकबाकीदार कर्मचाऱ्यांना अभय
- फक्त 2 कोटी वसूल
- शहरात 8 कोटीची थकबाकी
जिंतूर(अज़मत पठान)
संपूर्ण राज्यात सध्या महावितरनाची थकबाकी वसूली मोहीम जोमात सुरू असून त्यात जिंतुर तालुक्यात सर्व महावितरनाचे सर्व कर्मचारी अधिकारी भर उन्हात दिवस भर ग्राहक वर्गा कड़े बिल भरा सहकार्य करा म्हणत वसूली मोहीम राबवित असताना महावितरण च्या कर्मचारी यांच्या कडे हजारो रू थकबाकी असताना महावितरण कर्मचारी यांना अभय देत असुन तुटपुंज्या थकबाकी धारक ग्राहकांना डिस्कनेक्ट चा झटका देत आहे. तालुक्यात थकबाकीचा आकड़ा खूप फुगलेला आहे जवळपास 48 कोटी ज्यात
सर्व सामान्य ग्राहक शेतकरी व्यापारी शासकीय निमशासकीय कार्यालयाचा समावेश असल्याने महावितरण विभाग चांगलेच खडबडून जागे झाले असून मार्चच्या सुरवातीस सर्व शहराची पूर्ण विज बंद करुन ध्वनीप्रक्षपनाद्वारे वसूली बाबत जनजागृती करत तालुक्यातील एकूण 48 कोटी पैकी 23 मार्च पर्यंत कसेबसे 2 कोटी वसूल केले .
● महावितरण कर्मचारी यांच्या कडेच लाखोची थकबाकी:-
तालुक्यात अंसख़्य ग्राहक वर्गाच्या मीटर रीडिंग पेक्ष्या जास्तीचे बिल आल्याच्या तक्रारी मुळे ही जास्तीची डोके दुःखी महावितरणाची झाली कारण हा घोळ व्यवस्थित झाल्या शिवाय थकबाकिदार बिल अदा करण्याच्या मानसिकते मधे नव्हता या मुळे शहरात अधिकारी कर्मचारी याना वसूली सोडून बिलिंग कशी जास्त आली व ती व्यवस्थित करुण काही हफ्ते पाडून 2 कोटी रु कशीबशी करुण घेतली सध्या पण वसूली मोहीम जोरात सुरु असून महावितरण डिसकनेक्टेड पवित्र्या मुळे ग्राहक वर्ग कमालीचा धास्तविला असून सध्या तरी अधिकाऱ्याना वसुलीस सर्वसामान्य ग्राहक वर्गा तर्फे भेटत आहे रिडिंग न पाहता अंदाजे जास्तीचे बिल आल्या मुळे वसूली वर याचा परिनाम होताना दिसून येत आहे खाजगी कंत्राटदार सोयीनुसार ग्राहक पाहून रिडिंग टाकत असल्या मुळे किवा अंदाजे कारभार केल्या मुळे काही गरीब ग्राहकास लाखा वर बिल देवून हात झटकले ज्यानी बिल भरले त्यांचे पण अनवधानाने डिसकनेक्टचे प्रकार घडले महावितरण कर्मचाऱ्या कड़े लाखो वर बिल थकबाकी असताना कर्मचारी म्हनून अगोदर डोळेझाक करनाऱ्या अधिकाऱ्यास शेवटी चर्चा झाल्या नंतर सबधित महावितरणाच्या " त्या " कर्मचाऱ्याच्या वेतनातुन हफ्ते पाडून बिल वसूली करण्यात येत आहे असे पण प्रकार घड़ले आहेत बड्या बड्या मंडळी तसेच सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय तर्फे चांगला प्रतिसाद भेटुन व अधिकारी कर्मचारी असे वसुलीत लगे रहो राहिल्यास तर्फे वसूली टार्गेट पूर्ण होईल का नाही हा येनारा काळच सागेल या थकबाकी वसूली मोहिमेत उपकार्यकारी अभीयंता एस एम् नरवाडे मंडळ कार्यालयीन ऊप कार्यकारी अभीयंता अंम्बडकर व शहर अभियंता ए डब्लू कांबळी व सर्व कर्मचारी जाधव जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे अभियंता यांनी आपल्याच कर्मचाऱ्याला शिवाजी वाकळे यांच्य कडे 42 हजार 410 रु बाकी असून त्यांच्याकडे आंबडकर यांनी कान्हा डोळा करत सामान्य नागरिकांना जाणून बुजून त्रास दिला आशा अभियंत्यावर कार्यवाही व्हावी अशी चर्चा नागरिकांत होत आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें