जिंतूरच्या मुस्लिम महीलांनी तीन तलाक विधयका विरोधी दिले निवेदन.
प्रथमच मुस्लिम महिलांच्या अदभूत सहभागाने मैदान भरले.
अज़मत पठान.जिंतूर प्रतिनिधी, ( दि.२८/०३)
मुस्लिम शरियत नुसार दिला जाणाऱ्या तीन तलाक( घटस्फोट) ला केंद्र सरकारने लोकसभेत विधेयकाद्वारे कायद्याच्या आधारे बंदी घातली असून ही बंदी उठवण्यात यावी म्हणून ग्रामीण व शहरासह, तालुक्यातील सर्व पक्षीय मुस्लिम महिलांचा उत्स्फूर्त उपस्थित मोर्चा दि २८ मार्च बुधवार रोजी जमा मस्जिद येथील धरणे अदोलन करुण जिंतूर तहसीलदार यांना महिलानी दिले निवेदन.
जामा मस्जिद प्रगनांत बुधवार रोजी सकाळी ११ वाजता हजारोच्या संख्येत मुस्लिम महिला उपस्थित होत्या यावेळेस मुस्लिम महिला प्रतिनिधी म्हणून नफीसाबाजी हाशमी जमाते इस्लाम -ऐ-हिंद परभणी जिल्हा संघटक यांनी या सभेला संबोधतांना आपल्या भावना व्यक्त केले की केंद्र शासन हा आमच्या आतर्गत धार्मिक मुद्याला लक्ष करुण दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहे तीन तलाक हा इस्लामी शरीयत (धार्मिक नियमावली) ने मुस्लिम महिलेना दिलेले अधिकार आहे ती शरीयत आम्हाला मान्य आहे तरी शासनाने जो जाचक नवीन लोकसभेत तीन तलक विधायक पास केलेले आहे व सध्या राज्यसभेत विचाराधीन आहे म्हणून आम्ही सर्व भारतीय मुस्लिम महिला या तीन तलाक विधयकाला विरोध करत आहोत जर शासनाने हे विधयेक परत नाही घेतले तर मुस्लिम महिला रस्त्यावर येवुन विरोध प्रर्दशन करणार आहे.त्याच्या नंतर हाजराबाजी जमाते-ए-हिंद संघटक पाथरी यांनी सागितले की शासनाला मुस्लिम महिलाची खुपच आपुलकी असेल तर भारतीय मुस्लिम महिलांना शिक्षणनांत व शासकीय नोकरीत अरक्षण देऊ त्याचे सबलीकरण करणे आवश्यक आहे पण शासन तीन तलाक विधयका द्वारे मुस्लिम धर्मिक द्वोषापोटी हे विधयक पास करण्याचा प्रयत्न करुण येणार्या काळात मुस्लिम तरुणांना तुरुंगात डाबण्याचा डाव आखत आहे तरी शासनाला आम्ही महिला विनंती करतो की हे विधयक आम्हाला आजिबात मान्य नाही म्हणून हे नवीन तीन तलाक विधयक रद्द करुन मुस्लिम महिलाना न्याय देऊन उपक्रत करावे असे मत त्यानी व्यक्त केले नंतर या अँड.इफत सबा,अथरुन्नीसा बेगम,तहसीन सुल्लतान,जिंतूर न.पा.अध्यक्ष सबहा फारुखी या मुस्लिम महिला मंडळ जिंतूर व नफीसा हाशमी, मान्यवर पाहुणे महिलेच्या हस्ते नायब तहसीलदार गावंडे,राख,देशमुख आदी अधिकार्याच्या हाती तीन तलाक विधयक विरोधी निषेध निवेदन दिले आहे.या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौलाना तजमुल मिल्ली,मुफ्ती कलीम बेग,मौ.रशिद,मौ.सिराज,मौ.खुद्दुस,अहमद सिद्दिकी, मकसुद पठाण, खालेक बेलदार,शाहेद सिद्दिकी ,अनेक मुस्लिम महिलेने परीश्रम घेतले होते.तर पोलीस दल तर्फे पो.नि.आलेवार,नरवाडे ,सय्यद आदी कर्मचारीयांनी चोख बंदोबस्त ठेवले होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें