उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 मार्च 2018

उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही?

उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही?



समशेर खान.
विशेष.प्रतिनिधी.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर, आज याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कंपनीला उंदीर मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्या कंपनीच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहेमंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट मुंबईतील माझगाव परिसरातील विनायक मजूर सहकारी संस्था या कंपनीला देण्यात आलं होतं.6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं. मात्र 7 दिवसांतच सर्व उंदीर मारल्याचं सांगण्यात आलं. दिवसाला 45 हजार तर एका मिनिटाला 34 उंदीर मारल्याचं सांगितलं. पण या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें