गोंदिया जिल्ह्यातील पाणी* *टंचाईबाबत सुधारित कृती आराखडा तयार करावा -बबनराव लोणीकर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 मार्च 2018

गोंदिया जिल्ह्यातील पाणी* *टंचाईबाबत सुधारित कृती आराखडा तयार करावा -बबनराव लोणीकर

*गोंदिया जिल्ह्यातील पाणी* *टंचाईबाबत सुधारित कृती आराखडा तयार करावा -बबनराव लोणीकर



समशेर खान
लिशेष.प्रतिनिधी.
मुंबई, :  मा.आमदार श्री.गोपालदासजी अग्रवाल, यांनी विधानभवनात  गोंदिया जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याअनुषंगाने पाणी पुरवठा मंत्री, श्री.बबनराव लोणीकर यांनी त्याची दखल घेत सोमवार दिनांक 26 मार्च,२०१८ रोजी बैठक लावण्याचे सभागृहात सांगितले होते. त्याप्रमाणे आज मा.लोणीकर यांच्या दालनात ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत संपूर्ण गोंदिया जिल्हयातील पाणी टंचाईचा आढावा घेवून, जिल्हयाचा पाणी टंचाईचा पुर्नआढावा घेऊन सुधारित कृती आराखडा तयार करावा.  ज्या ठिकाणी आवश्यक असेल तिथेच पाणीटंचाई अंतर्गत *उपाययोजना करुन पाणीपुरवठा करावा, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले*.
 यावेळी सामाजिक न्याय मंत्री, तथा पालकमंत्री, जि.गोंदिया श्री.राजकुमार बडोले,आमदार विजय रहांगडाले, आमदार गोपालदास अग्रवाल, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, उपसचिव एम.बी. सावंत,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दयानिधी आदी उपस्थित होते
श्री. लोणीकर म्हणाले, गोंदिया जिल्हयातील पावसाचे प्रमाण यावर्षी सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे जिल्हयात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सध्या तयार केलेला टंचाई आराखडा हा १ कोटी ४६ लक्ष एवढा असून तो कमी असल्याचे निर्देशनास येत आहे. त्यामुळेगोंदिया *जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत आमदार यांच्या अध्यक्षतेखालील आमसभा बोलावूण त्यासभेस जिल्हा परिषद, पंचायत समिती,ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक,तलाठी यांना आमंत्रित करुन गावपातळीवरच्या पाणीटंचाईच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे नव्याने टंचाई आराखडा तयार* करावा.  या टंचाई आराखडया प्रमाणे सर्व प्रस्तावीत कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. निधी अभावी कोणत्याही गावाला टंचाईची अडचण भासू दिली जाणार नाही.
*राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हयामध्ये मागील ३ वर्षात एकूण १४८ योजना पूर्ण झालेल्या आहेत. या योजना पूर्ण करण्यासाठी शासनाच्यावतीने ४३ कोटी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत*. सद्यस्थितीत ९३ योजना या प्रगतीपथावर आहेत. या सर्व योजनांची कामे विहित वेळेत पूर्ण करण्यात यावीत व विलंब करणारे कंत्राटदार यांना *नियमाप्रमाणे दंड करण्यात यावा*. तसेच प्रलंबित असलेल्या योजना तातडीने सुरु कराव्यात. या योजनेतून किती कामे झालीकाही योजना सुरु झाल्या नाहीत, त्‍यामध्ये मुख्य कार्यकारी  अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी आढावा घेऊन कामे तात्काळ सुरु करावीत असे निर्देशही यावेळी दिले.
यावेळी गोंदिया जिल्ह्यातील टंचाई कृती आराखडा,राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम,मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम,स्वच्छ भारत मिशन,सुजल निर्मल अभियान, गोंदिया जिल्ह्यात मजीप्रा व पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद,येथील पूर्ण झालेल्या व  अपूर्ण असलेल्या कामाची माहिती,आदि विषयाचा यावेळी श्री .लोणीकर यांनी आढावा घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें