मानोली येथील ग्रामपंचायत च्या वतीने जनावरांना लसीकरण.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१६ : मानवत तालुक्यातील मानोली ग्रामपंचायत व मानवत पशु वैद्यकीय दवाखाना यांच्या सयुक्त विद्यमाने १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता २८० जनावरांना लाळ्या रोग व खुरखत या रोगावर मात करण्यासाठि मानोली येथे लसीचे मोफत लसीकरण करण्यात आले होते.
मानोली येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ झालेल्या या लसीकरण शिबीराचे उदघाटन उपसरपंच भगवान भांड याच्या हस्ते करण्यात आले . या शिबीरात जनावरांची तपासणी करुन उपचार करुन लाळ्या खुरकत लस २८० जनावराना देण्यात आले. सद्यस्थितीत लाळ्या खुरकत लसीचा तुटवडा असताना व त्याची साथ तालुक्यात असुन या रोगावर प्रतिबांधात्मक उपाय म्हणुन या शिबीरात जनावरांना मोफत लसी देण्यात आले आहे. यावेळी मानोलीचे सरपंच ज्ञानोबा मदनराव शिंदे,पशुवैद्यकिय अधिकारि डॉ.हुसेन चाउस ,डॉ.नितीन वेदपाठक,डॉ.माणीक वाघ,डॉ.आठवले, माजी सरपंच मदनराव शिंदे,ज्ञानेश्वर मेहञे,ज्ञानेश्वर शिंदे ,महादेव शिंदे,शरद शिंदे ,प्रताप काकडे यांच्यासह मोठ्याप्रमाणात पशुपालक व गावकरी उपस्थीत होते,

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें