पाणी टंचाई आढावा बैठकीत पञकाराना प्रवेश बंदी .
बंद दरवाजात पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१६: जिल्हयात प्रत्येक तालुक्यात सध्या पाणी टंचाई बैठका सुरु असुन याच संबधी मानवत पंचायतसमीती येथे आज दि.१६ मार्च रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी यांच्या उपस्थीतीत पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते माञ काहि कारणास्तव जिल्हाधिकारी पि.शिवाशंकर बैठकिस उपस्थीत राहु शकले नाही या बैठकिस अतिरिक्त जिल्हाधिकारी आण्णासाहेब शिंदे व पाथरी चे उपजिल्हाधिकारी एस .एस .कोकणी मानवतचे तहसिलदार नकुल वाघुंडे हे उपस्थीत होते तसेच या बैठकीत तालुक्यातील शासकिय कर्मचारि उपस्थीत होते या आढावा बैठकिस मानवत येथील पञकार बांधव हि पंचायतसमीती येथील बैठकीत गेले आसता पाथरी चे उपजिल्हाधिकारी एस .एस .कोकणी यांनी पञकार बांधवाना बैठकीतुन बाहेर जाण्याचा फरमान काढला यावर पञकारांना का बाहेर काढले जात आहे यावर कोकणी यांना जाब विचारला असता ते म्हणाले की हि पाणी टंचाई आढावा बैठकीत फक्त शासकिय अधिकारि च बसु शकतात यावर सर्व पञकारांनी तेथेच निषेध नोदविंत आढावा बैठकिवर बहिष्कार टाकुन सभागृहातुन बाहेर पडले.अशा अधिकाऱ्यांनी असे फतवे काढुन माध्यमांची मुस्कटदाबी करने योग्य नसुन मानवत तालुका वगळता जिल्हयातील सर्वच तालुक्यात पाणी टंचाई आढावा बैठका सुरु आसुन माञ तेथे पञकाराना प्रवेश बंदी नव्हती मग मानवत येथेच चौथ्या स्तंभावर हे अधिकारि आघात का करत आहे बंद दारात या अधिकाऱ्यांना पाणी टंचाई आढावा बैठकीत गुप्तपणे चर्चा तरी काय करायची की ज्या बैठकीत लोकप्रतिनिधी नाही गावाचे सरपंच नाही पञकार नाही मग पाणी टंचाई वर उपाय तरी प्रशासन कसे करनार.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें