पाथरी आगारातील १२३ एस टी कामगारांची स्वेच्छा मरणाची मागणी.
स.अहमद अन्सारी.प्रतिनिधी.पाथरी.
गेल्या चोविस महीण्या पासुन एस टी कामगारांचा वेतनाचा तिढा सुटलेला नाही,कमी वेतन आणि त्यातच कर्ज घेतल्यामुळे आर्थिक हाल अपेष्टेत जिवन व्यथीत करावे लागत आहेत.त्यामुळे आम्ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल झालो आसुन मानसिक दृष्ट्याही
खचलो आहोत.
*हे पाहाता आम्हाला स्वेच्छामरनाची परवानगी द्यावी आशी मागणी पाथरी आगार { परभणी विभागातील } १२३ एस टी कामगारांनी निवेदना व्दारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या कडे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांच्याकडे एका पत्रव्दारे केली आहे.*
हे निवेदन संघटना विरहित सर्व कर्मचार्यानी एकत्र येऊन दिले आहे.
गेल्या दोन वर्षापासुन वेतन वाढीसाठी वेत वाढ मिळावी म्हनुण संपही पुकारण्यात आला
मात्र त्यांनंतरही तोडगा निघालेला नाही.एस टी कर्मचार्यान एक रुपायही वेतन वाढ मिळालेले नाही.
*एस टी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करावे,करारपध्दत रद्द करुन सातवा वेतन आयोगा प्रमाने वेतन देण्यात यावे या मागण्यासाठी १२३ कामगारांच्या सह्याचे निवेदन मा.राज्यपाल साहेब,मा मुख्यमंत्री साहेब यांना पाठवण्यात आलेले आहे.*
सध्या कार्यरत असलेल्या एस टी च्या २२ संघटना आसुनही यावर तोडगा काढण्यात सपसेल अपयशी ठरल्या मुळे स्वतः कामगारांनाच वेतन वाढी साठी संघटना विरहीत संघर्ष करावा लागत आहे.
*सध्या कर्मचार्याची आर्थिक कोंडी होत आसुनकर्मर्याची आर्थिक आणि मानसिक पिळवणुक होत आहे.त्यामुळे स्वेच्छामरनाची परवानगी मागतानी सर्वाणी स्वईच्छेने व कोनाच्याही दबावाला बळी न पडता स्वाक्षर्या केल्या आहेत.*
*आन्य राज्यांच्या तुलनेत मिळनारे वेतन महाराष्ट्र एस टी कामगारांना अतिशय अल्प.*
देशातीलअन्य राज्य परीवहन महामंडळाच्या तुलणेत एस टी महामंडळ ची सेवा दखलपात्र आहे.मात्र ईतर राज्याच्या परीवहन सेवेतील कर्मचार्यांच्या
तुलनेत एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्याच्या कामगारांना वेतन तोडके आहे.सर्वाधीक वेतन तेलंगना परीवहन कर्मचार्याना
आहे,त्यानंतर कर्नाटक ,राजस्थान
व उत्तर प्रदेश परीवहन कर्मचार्याना मिळत आहे.वेतनाच्या क्रमवारीत एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य कामगार हा शेवटच्या स्थानावर आहे.
वेतन वाढी बाबद कायदेशीर-बेकायदेशिर बाबी कारणी भूत असुन,सरकारही या बाबतीत
*उदासीन* आहे.
या आन्याय ग्रस्त एस टी कामगाराला न्याय मा राज्यपाल साहेबानी आणि मा मुख्यमंत्री साहेबानी द्यावा,नसता आम्हाला स्वेच्छा मरनाची परवानगी द्यावी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें