संगणक परीचालक 5 मार्चला मुबंई विधानभवनावर धडकणार - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 3 मार्च 2018

संगणक परीचालक 5 मार्चला मुबंई विधानभवनावर धडकणार

संगणक परीचालक 5 मार्चला मुबंई विधानभवनावर धडकणार


प्रतिनिधी-

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले संगणक परिचालक यांचे मानधन 7 महिन्यापासून थकलेले आहे,त्याच पार्श्वभूमीवर संगणक परिचालक संघटनेच्या वतीने मुंबई येथे विधानभवनावर दिनांक 5 मार्च रोजी आपल्या विविध मागण्या घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हजारोच्या संख्येने संगणक परिचालक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.त्याच संदर्भातील मोर्चाचे निवेदन संगणक परिचालक संघटना भोकरदन यांच्या वतीने गटविकास अधिकारी डॉ. अरुण चौलवार यांना देण्यात आले.
या निवेदनावर संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष हजारे,अनिल भुतेकर, मारोती शिंदे,सतिष ठोंबरे आदींच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें