महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समिती जिल्हा कार्यकारीणी जाहीर
*बाबासाहेब गर्जे यांची उपाध्यक्षपदी निवड*सोनपेठ(राजेश खेडकर) दि.३०मार्च २०१८
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समिती, "ग्रंथालय जनसंपर्क अभियान" अंतर्गत परभणी येथे नुकतीच "जिल्हास्तरीय बैठक" मा. ज्ञानोबा मुंढे मामा यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अध्यक्ष अक्रुरमामा सोनटक्के व जनसंपर्क अभियान प्रमुख गोपाळ अहंकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी परभणी जिल्हा कार्यकारीणीची निवड करण्यात आली.
बैठकीत जिल्हा अध्यक्षपदी ए.बी.शिंदे, कार्यकारी प्रमुखपदी सुरेश जंपनगीरे, उपाध्यक्ष- गोविंद मोरतळे, बाबासाहेब गर्जे, कोषाध्यक्ष- सुरेश जोशी, सहसचिव- प्रकाश हिवरकर, हयातभाई यांची निवड झाली तर सदस्य म्हणून साहेबराव कदम, गणेश भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संदीप पेडगावकर, श्रीधर खुपसे, सतिश टाकळकर, सुभाष बंडे, रमेश मुलगीर, केशव ईक्कर, विष्णू मस्के, रामराव शिंदे, मंचक जगताप, किशोर नेटके, विनायक शिंदे, डि.एन. कुलकर्णी, अशोक सामाले, बालाजी शिंदे, वसंत हातागळे,रामेश्वर पवार, प्रभाकर कऱ्हाळे, लक्ष्मणराव खटींग, विजय कदम, वसंत लवंदे, मैनोद्दिन सय्यद, परमेश्वर मुलगीर, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह ग्रंथालय कर्मचारी व चालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
या निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें