मानवत येथे डॉ. नेत्रदीप दगडु ट्रस्टच्या वतीने जनावरांना मोफत लसीकरण .
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१५: मानवत येथील डॉ. नेत्रदीप दगडु चॅरिटेबल ट्रस्ट व मानवत पशु वैद्यकीय दवाखाना यांच्या सयुक्त विद्यमाने १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता जनावरांना लाळ्या रोग व खुरखत या रोगावर मात करण्यासाठि लसीचे मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात झालेल्या या शिबीराचे उदघाटन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय लड्डा यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी वामनराव कोक्कर, नंदलाल मंत्री, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर मोरे, संजय यादव, रामनिवास सारडा, डॉ निनाद दगडु, बाळुसेठ बांगड, पशुवैद्यकिय अधीकारी डॉ. हुसेन चाउस, सोपान सोरेकर, विशाल कडतन,मानवत भुषन संस्थाचे उपाध्यक्ष ॲड. गणेश मोरे पाटील, अमोल कदम ,नितीन वेदपाठक आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबीरात जनावरांची तपासणी करुन उपचार करुन लाळ्या खुरकत लस ३४२ जनावराना देण्यात आले. सद्यस्थितीत लाळ्या खुरकत लसीचा तुटवडा असताना व त्याची साथ तालुक्यात असुन या रोगावर प्रतिबांधात्मक उपाय म्हणुन या शिबीरात जनावरांना मोफत लसी देण्यात आल्याने पशु पालकानी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवि आठवले यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तात्याराव साळवे, ज्ञानेश्वर म्हेत्रे यांच्यासह डॉ .नेत्रदीप दगडु चॅरिटेबल च्या पदाधिकार्यानी परिश्रम घेतले.
Tezznews24 web news channel.
Contact.no.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें