आॅनलाईन खरेदीत ग्राहकांची लुट -स्वरुप कंकाळ
◆सेलू येथे जागतिक ग्राहक दिन साजरा
समशेर खानसेलू :- प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे व सध्या ग्राहक हा अमिषाला बळी पडुन आॅनलाईन पद्धतीने घर बसल्या खरेदी करत आहे परंतु या आॅनलाईन पद्धतीमध्ये ग्राहकांची एक प्रकारे लुट चालवली असल्याचे प्रतिपादन तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी केले आहे.
शनिवारी 17 मार्च रोजी जागतीक ग्राहक दिनाच्या निमित्त श्रीराम प्रतिष्ठाण येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत व तहसिल कार्यालयच्या संयुक्त विद्यमाने परिसंवाद व चर्चासत्रात आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्रीराम प्रतिष्टानचे अध्यक्ष डाॅ. संजय रोडगे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे, गटविकास अधिकारी अहिरे, नायब तहसीलदार तुकाराम सुगंधे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. एस. झाडबुके, रजिस्टार संजय सुंठवाड, वैद्यमापनशास्त्र निरिक्षक सुदाम करपे, अॅड. शंकर संगेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या इंद्रायणी रोडगे, शिवाजी आकात, प्रशासकिय अधिकारी महादेव साबळे, प्राचार्य अशोक बोडखे, अशोक कोपुलवार आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री कंकाळ म्हणाले की, सध्या अधुनिक युगामध्ये नागरीक आॅनलाईन पद्धतीने खरेदी करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. परंतु ही खरेदी करत असतांना वस्तुची गुणवत्ता याची जबाबदारी ही आॅनलाईन कंपनीची नसते यामुळे खराब झालेली वस्तु परत करता येत नाही. ग्राहकांना नाहक भुर्दंड बसतो यामुळे खरेदी करत असतांना ग्राहकानी सावध राहिले पाहिजे. चांगल्या वस्तु खरेदी करणे हा ग्राहकांचा हक्क आसल्याचेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही ग्राहकांचे हक्क व अधिकारी मिळावेत यासाठी कार्यरत आहे. सध्या कोणत्याही खरेदीमध्ये ग्राहकांची फसवणुक होत आहे. परंतु ग्राहकांना माहित नाही की तक्रार कोठे करावी याची जनजागृती अखिल भारतीय ग्राहक पंचायत करत आसून ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे यांनी केले. यावेळी अॅड. शंकर संगेकर, एस. एस. झाडबुके यांनी ग्राहकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अश्विनी घोगरे तर सुत्रसंचलन योगेश ढवारे यांनी केले.यावेळी श्रीराम प्रतिष्ठान येथे अपुर्वा पाँलटेक्नीक चे विद्यार्थी, कर्मचारी यांची उपस्थिति होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी व तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें