गुरु ष.ब्र.श्री.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांना मातृशोक
सोनपेठ(राजेश खेडकर) १९ मार्च २०१८शहरातील श्री नंदिकेश्वर मठ संस्थानचे मठाधिपती गुरु ष.ब्र.श्री.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या मातोश्री शंकरअम्मा गुरुस्वामी हिरेमठ रा.कोरवार.जि.विजापुर (कर्नाटक राज्य) यांचे वृद्धापकाळाने आज दि.१९ मार्च २०१८ सोमवार चैत्र.शु.२ तिथीस राहत्या घरी दुख:द निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८५ वर्ष होते. त्यांच्यावर अंतिम संस्कार आज दि.१९ मार्च २०१८ सोमवार रोजी कोरवार जी.विजापुर (कर्नाटक राज्य) येथे सायंकाळी ५ वाजता करन्यात येनार आहेत.
त्यांच्या पश्चात दुसरा मुलगा गंगाधर गुरुस्वामी हिरेमठ व दोन मुली असा परीवार आहे. गुरु.ष.ब्र.श्री.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य यांचा पठाभिषेक श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे झाल्यापासुन ते येथिल सर्व शिष्य मंडळी, विरशैव समाज बांधव तसेच इतर धर्मीय समाज बांधवात एकरुप झाले आहेत. असे असले तरी, महाराज महिन्यातुन दोन ते तिन वेळेस मातोश्रींच्या भेटी साठी वेळातवेळ काढुन जात आसत. गुरू माता यांच्या दुख:द निधनाने पंचक्रोशितील सर्वच समाज बांधवातुन दुख: व्यक्त होत असुन दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी प्रार्थना करण्यात येत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें