भोकरदन-सिल्लोड रोडवर भीषण अपघात ● वेळेवर मदत न मिळाल्याने तीन जण ठार - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 मार्च 2018

भोकरदन-सिल्लोड रोडवर भीषण अपघात ● वेळेवर मदत न मिळाल्याने तीन जण ठार

भोकरदन-सिल्लोड रोडवर भीषण अपघात ● वेळेवर मदत न मिळाल्याने तीन जण ठार.

शे.सलिम.
भोकरदन (प्रतिनिधी)
       भोकरदन-सिल्लोड रोडवर मालखेडा पाटीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन चिरडल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाला तर एकाचा उपचारासाठी औरंगाबादला नेत असताना रस्त्यातच आळंदजवळ मृत्यू झाला.
    दरम्यान घटना घडल्यानंतर तब्बल दोन तास त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. घटनास्थळी आसपासच्या लोकांनी मदतकार्य न करता बघ्याची भूमिका घेऊन घटनेचे फोटो सेशन करण्यास प्राधान्य दिले. याची माहिती मिळताच शिवसेनेचे शहरप्रमुख महेश पुरोहित यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
    याविषयी सविस्तर माहिती अशी की, शिवना ता.सिल्लोड येथील जितेंद्र रतन जगताप वय २१, राहुल सदाशिव जगताप वय २२ व राहुल एकनाथ जगताप वय २२ हे तीघे जण भोकरदन हुन सिल्लोडकडे दुचाकी क्रमांक एम.एच.२०ई एन.०४६६ वर  जात होते.यापैकी राहुल एकनाथ जगताप याचे १ एप्रिल रोजी लग्न ठरले असल्याचे समजते.संध्याकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली व त्यांना चिरडून वाहन पसार  झाले.यामध्ये जितेंद्र रतन जगताप व राहुल सदाशिव जगताप रा.शिवना हे दोघे जागीच ठार झाले तर राहुल एकनाथ जगताप याचा औरंगाबाद ला नेत असताना आळंदजवळ  मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात मोठ्या वाहनाने भोकरदन येथील शुभम बाबुराव तळेकर व प्रज्वल फुसे हे सिल्लोडहून बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परतत होते त्यांच्या गाडीलाही घासून धडक दिली.यामध्ये ते किरकोळ जखमी झाले. शिवसेनेचे महेश पुरोहित , भगवान बैंनाडे, सरदार राजपूत, अजय थारेवाल, सिद्धार्थ जाधव यांनी मदतकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें