क्षयरोगाच्या उपचारापासुन एकही रूग्ण वंचित राहता कामा नये=भावनाताई नखाते.
आरोग्य समितीच्या बैठकीत भावना नखाते यांचा अधिकार्यांना सज्जड इशारा
रुग्णांना मिळणार ५०० रूपये महिना
१ एप्रिल पासून मोहिमेस प्रारंभ
सेलू (समशेर पठाण )
क्षयरोग हा एक जिवाणूजन्य गंभीर आजार असून हा आजार औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो यामुळे १ एप्रिल पासून क्षयरोग निर्मूलन करिता विशेष मोहीम राबविली जात असून क्षयरोगाच्या उपचारापासुन एक ही रुग्ण वंचित राहता कामा नये असा सज्जड ईशारा जि.प.उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ भावना अनिलराव नखाते यांनी आरोग्य अधिकार्यांना दिला .त्याचबरोबर अशा रूग्णांना दरमहा ५०० रुपये दिले जाणार आहेत अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा आरोग्य समितीची बैठक आरोग्य सभापती सौ भावना नखाते यांचे अध्यक्षतेखाली २६ मार्च रोजी दुपारी ३ वा घेण्यात आली यावेळी जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड ,भगवान सानप ,अंजली रविंद्र देशमुख ,उमा रंगनाथराव वाकणकर ,वसुंधरा सुभाषराव घुंबरे ,शालीनीताई शिवाजीराव राऊत ,विशाखा विश्वनाथराव सोळंके ,सुषमाताई गोविंदराव देशमुख ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती .
यावेळी सौ भावना नखाते यांनी २ उपजिल्हा रूग्णालय ,७ ग्रामीण रुग्णालय ,३१ प्राथमिक आरोग्य केंद्र,२१४ उपकेंद्र ,स्री रूग्णालय व जिल्हारूग्णालयातील आरोग्ययंत्रणेचा पुर्णपणे आढावा घेतला.
तसेच १ एप्रील पासून प्रत्येक ग्रामीण भागात गावा गावात ,तांड्यात व वस्तीत क्षयरोग रूग्णांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवावी तसेच आढळून आलेल्या रूग्णांना क्षयरोग(टि.बी) हा औषधोपचाराने पुर्णपणे बरा होतो व औषधोपचार पध्दती बाबत समुपदेशन करावे व त्यांना तात्काळ औषधोपचार सुरू करावा .तसेच या रूग्णांना सहा ते आठ महिन्यापर्यंत दरमहा ५०० रूपये देण्यात यावे असे निर्देश सौ भावना नखाते यांनी अधिकार्यांना बैठकीत दिले.मात्र क्षयरोगाचा एकही रूग्ण उपचारापासुन वंचीत रहता कामा नये असा सज्जड ईशारा देण्यास भावना नखाते विसरल्या नाहीत.
यावेळी उपलब्ध औषधी साठ्याचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांची प्रसुती झाली पाहिजे या विषयावर सविस्तर चर्चा झाली .तसेच कर्मचारी यांनी ठरवून दिलेल्या वेळेत उपस्थीत रहावे.व सर्व सामान्य जनतेला आरोग्य सुविधा द्यावी . अधिकार्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांची पाठराखण करु नये अशा सुचना यावेळी सौ भावना नखाते यांनी दिल्या .
गावाच्या आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्विकारावी.....
प्रत्येक गावातील आरोग्य चांगले राहण्यासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी सामाजिक बांधिलकीतुन जबाबदारी स्विकारावी .तसेच मलेरीया ,डेंग्यू असे गंभीर आजार पसरवणार्या डासांचा नयनाट करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून धूरफवारणी यंत्र खरेदी करावे तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने दरमहा तपासून ब्लिचिंग पावडर चा वापर करावा अशी सुचना यावेळी सौ.भावना नखाते यांनी दिल्या.
आजार टाळण्याचे उपाय.....
क्षयरोग हा आजार मायकोबँक्टेरीया या प्रकारच्या जिवाणू मुळे होतो .हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे कमी वेळात फैलावतो .या आजारासाठी सहा महिने औषधोपचाराची आवश्यकता असून औषधोपचारात सातत्य असणे आवश्यक आहे .क्षयरोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते,क्षयरोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणून पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे,क्षयरोग तपासण्या करून घेणे,क्षयरोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे,
खोकलतांना तोंड रूमालाने झाकणे याचा वापर करावा असे अवाहनही सौ नखाते यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें