दुष्काळमुक्त करणे हे आपले सर्वात पाहिले उद्दिष्ट !!
दोन हात, दोन तास.. दुष्काळमुक्तीचा उपाय खास..!! -मेघना साकोरे- बोर्डीकर,
पठाण अजमतः
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिंतूर तालुका दुष्काळमुक्त करणे हे आपले सर्वात पाहिले उद्दिष्ट आहे.त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जलदूत मेघना साकोरे- बोर्डीकर,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांनीआज परभणीला दिली . जिंतूर तालुक्यात पाणी समस्येवर मात करण्यासाठी संपूर्ण महिनाभर एक मोठी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या
जिंतूर तालुक्याला किमान तीन बक्षिसे मिळतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला . जलव्यवस्थापनेचे आपण अबाजोगाई येथे प्रशिक्षण घेतले असल्याचा उल्लेख त्यांनी केला .
पाणी_फाऊंडेशन चा हा विश्वास आहे, की अपुऱ्या पाण्याच्या संकटावरचा उपाय हा पाणलोट व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण व पावसाच्या पाण्याचे नियोजन यात दडलेला आहे. याकरिता लोकांना प्रेरित करणे, प्रशिक्षित करणे आणि सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे..
पाणी फाऊंडेशनच्या ह्या वर्षी निवडण्यात आलेल्या ७० तालुक्यां मधे आपल्या जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याची निवड झालेली आहे. आपला तालुका दुष्काळमुक्त करणे हे आपले सर्वात पाहिले उद्दिष्ट आहे. या चळवळीत विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यवसायिक थोडक्यात समाजातील सर्व स्तरातील असंख्य लोक जेव्हा उतरतील तेव्हाच हे शक्य होईल.
या, आपण सर्व मिळून या चळवळीत सहभागी होऊ. कोण जाणो, तुमचा सहभाग या चळवळीला अंतिम विजयाची रेषा पार करून देणारा महत्वाचा घटक ठरेल. प्रत्येक विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक...
थोडक्यात समाजातील सर्व स्तरातील असंख्य लोक म्हणजेच जलक्रांतिकारक जेव्हा या चळवळीत उतरतील तेव्हाच, हे शक्य होईल. आम्हाला विश्वास आहे की आपण सर्व जण जेव्हा यामध्ये सहभागी होवू, तेव्हा आपण पाण्याचे हे युद्ध नक्कीच जिंकून दुष्काळाला हरवू शकू..!
या मोहिमेत सहभागी व्हा. येत्या ८ एप्रिल ते २० मे पर्यंत आपले अमूल्य असे फक्त २ तास वेळ द्या..
असे आवाहन जलदूत मेघना साकोरे- बोर्डीकर,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे . अधिक माहितीस संपर्क:- 77758 52222स्वप्नील कडे ७०२१८३९८९४साधावा .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें