एसबीआयचे एटीएम वापरणे होणार आणखी सोपे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 मार्च 2018

एसबीआयचे एटीएम वापरणे होणार आणखी सोपे.

एसबीआयचे एटीएम वापरणे होणार आणखी सोपे. 

मोदी सरकारने नोटाबंदी लागू केल्यानंतर ई-व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एटीएम आणि ऑनलाइन व्यवहारांमध्ये मागच्या दिड वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच फायदा घेऊन बँका आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकताच आपल्या एटीएम कार्डमध्ये बदल केला असून ग्राहकांसाठी हा बदल फायदेशीर ठरणार आहे. ग्राहकांना गैरव्यवहारांपासून दूर ठेवण्यासाठी हे नवीन अॅप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. एसबीआय क्विक असे या अॅप्लिकेशनचे नाव असून ते तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागणार आहे. स्मार्टफोन आणि नेटबँकींग वापरणाऱ्यांसाठी हे अॅप्लिकेशन अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या फिचरमुळे ग्राहक स्मार्टफोनवरुनच आपले एटीएम कार्ड ऑन आणि ऑफ करु शकणार आहेत. म्हणजेच अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एटीएम कार्डवर नियंत्रण ठेवता येणार आहे. आपला जो क्रमांक बँकेत रजिस्टर आहे त्यावरुन हे अॅप्लिकेशन वापरता येणार आहे. या अॅप्लिकेशनच्या साह्याने आपण एटीएम कार्ड ब्लॉकही करु शकतो. त्यामुळे आपले कार्ड हरवल्यास त्याचा चांगला फायदा होणार आहे. यामध्ये पिन नंबर जनरेट करण्याचीही सुविधा देण्यात आल्याने हे कार्ड अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
आतंरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर एटीएम चालावे असे सेंटीगही या अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सुरुवातीला या अॅप्लिकेशनचा वापर मिसकॉल आणि एसएमएस बँकींगसाठी होत होता. मात्र आता त्याचे क्षेत्र विस्तारले असून इतरही सुविधा वापरता येणार आहेत. आपल्या अकाऊंटमध्ये असणारी शिल्लक रक्कम तसेच मागील १० व्यवहारांची माहितीही यामध्ये मिळू शकणार आहे. तुम्हाला नवीन पासबुक हवे असल्यास त्यासाठीची विनंती आपण या अॅपवरुन पाठवू शकतो. त्यामुळे एसबीआयच्या ग्राहकांसाठी हे अॅप्लिकेशन ही एक उत्तम संधी असेल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें