जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश नंतर अतिक्रमण काढले जाणार का? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 31 मार्च 2018

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश नंतर अतिक्रमण काढले जाणार का?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश नंतर अतिक्रमण काढले जाणार का?

 पठाण अजमत (जिंतूर):
    परभणीचे जिल्हाधिकारी यांच्या व्दारे जिंतूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम व जि.परिषद शाळेच्या मैदानात झालेले अतिक्रमण काढण्याचे आदेश देन्यात आले .परंतु अधिकाऱ्यांत कोणतीही. तैयारी दिसत नसल्याने अतिक्रमण काढले जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
             सर्वोच्च न्यायालया व्दारे  अतिक्रमण काढण्याचे निर्देशा नूसार राज्य सरकारच्या अध्यादेशाव्दारे सूचना देत जिंतूर सा.बा.विभाग व जिल्हा परिषद मैदानात झालेले अतिक्रमण काढण्याचे आदेश परभणी जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व कार्यकारी अभियंता सार्वजनिक विभागाला देण्यात आले.
       सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेले अतिक्रमण व जि.प.मैदानावर चेही अतिक्रमण मागिल पाच-सहा महिने अगोदर काढले गेले होते. पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण जसाच तसे दिसत आहे.
       शहरातील जेष्ठ पत्रकार एम.ए. माजीद यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देवून अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहे. या आदेशा चे पालन कधि होनार या कळे पुर्ण शहराचे लक्ष लागले आहे .अतीक्रमना मूळे वाहतूकीस व पाय चालनाऱ्यांना त्रास होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें