जिंतूर तालुक्यातील (ग्रामीण) रमाई आवास योजनेतील टप्पा - 3 मधील वाढीव उदिष्ट मागवून पात्र लाभार्थ्यांना दिला घरकुल योजनेचा लाभ - आ.विजय भांबळे.
जिंतूर – (पठाण अजमत): आज दि. ३१/०३/२०१८ रोजी मौलाना आझाद हॉल, नगर परिषद जिंतूर येथे पंचायत समिती जिंतूर मार्फत रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थ्याचा टप्पा – ३ चा मेळावा आ.विजय भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी पात्र लाभार्थ्यांना आ.विजय भांबळे यांच्या हस्ते निवड पत्राचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील अनु.जातीतील नागरिकांना ‘रमाई आवास योजने अंतर्गत पक्के घर बांधून देण्यासाठी हि योजना राबवली जाते. त्या अनुषंगाने पंचायत समिती जिंतूर अंतर्गत तिसऱ्या टप्प्यात १००२ (एक हजार दोन) घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. या रमाई आवास योजने अंतर्गत प्रती लाभार्थ्यास १,२०,०००/- रु (एक लक्ष वीस हजार रु.) एवढा लाभ मिळणार आहे.
कार्यक्रम प्रसंगी आ.विजय भांबळे यांनी टप्पा क्र.१ वेळेस एकही लाभार्थी वंचित राहणार नाही. सर्व लाभार्थ्यांना इतर तालुक्यातील उर्वरित उद्दिष्ट वळवून जिंतूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात येईल असा शब्द दिला होता. त्या शब्दाची वचनपूर्ती करत आज जिंतूर तालुक्यास १००२ एवढे उद्दिष्ट वाढीव मागवून अनु.जातीतील प्रत्येक वंचित लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ देण्यात आला हे स्पष्ट झाले.
यावेळी आ.विजय भांबळे, जिल्हा परिषद गट नेते अजय चौधरी, सदस्य प्रसादराव बुधवंत, नानासाहेब राऊत, बाळासाहेब घुगे, विठ्ठल घोगरे, अभिनय राऊत, अविनाश काळे, मुरली मते, प.स.सभापती मधुकर भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, प.स.सदस्य प्रकाश शेवाळे, दौलतराव दाभाडे, गणेश इलग, शरद मस्के, मुंजाभाऊ तळेकर, दिलीप राव डोईफोडे, प्रल्हादराव ढोणे, यांच्यासह रमाईआवास योजनेचे लाभार्थी व राष्ट्रवादी कॉंग्रस चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें