विभागीय तालुकास्तरीय शालेय व्यवस्थापन समितीच्या मेळावा संपन्न.
शे.सलिम.भोकरदन:-प्रतिनिधी दि ३१मार्च)
जिल्हा परिषदेच्या शाळा खेड्यापाड्यामधून तळागाळातील, सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य करित आहेत. ह्या मूलांना चांगले शिक्षण देवून कुटूंबाचे, गावाचे, व समाजाचे भविष्य घडविण्याच्या दृष्टीने शालेय व्यवस्थापन समित्या आणि शिक्षकांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले.
ते जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था जालना व गटशिक्षणाधिकारी कार्यालय, भोकरदन आयोजीत तालुकास्तरीय विभागीय शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मेळाव्या प्रसंगी बोलत होते. आज दि.३१ मार्च रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय भोकरदन येथे आयोजीत मेळाव्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्धाटक विलाससेठ आडगावकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती गजानन नागवे,गटविकास अधिकारी डॉ.अरूण चौलवार,आधिव्याख्याता डॉ.सतिष सातव, विषयसहाय्यक भाऊसाहेब काकडे, माजी जि.प.अध्यक्ष तुकाराम जाधव, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदमाने, आदी मान्यवरांसह शालेय पोषण आहार अधिक्षक शेख सय्यद, तालुका शिक्षण समन्वय समिती सदस्य विनोद गावंडे,प्रदीप इंगळे, गट समन्वयक एस बी नेव्हार, शिक्षणविस्तार अधिकारी यु.एन.जैन व शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजहर पठाण,आदी मान्यवर विचार उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केवळ भौतीकसुविधा उपलब्ध करून थांबायचे नसते तर उपलब्ध साहित्याचा योग्य वापर होण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असते. नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शाळेसाठी करण्याचे आवाहान देखील त्यांनी केले.
यावेळी आमदार, मान्यवरांनी व उपस्थित सर्व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विविध शैक्षणिक स्टॉलला भेटी देवून मराठीपेटी व गणितपेटी साहित्याबाबत व E-Learning च्या साहित्याबाबत माहिती घेवून चर्चा केली. वाचनोत्सव बाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी मेळाव्यात राज्यातील शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातुन शाळांचा विकास कशा पद्धतीने झाला याबाबत चित्रफीत दाखवुन, त्यावर चर्चा झाली.
याशिवाय ज्या शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी लातुरला झालेल्या 'शिक्षणाची वारी ' ला भेटी दिल्या त्यांनी आपले अनुभवकथन केले.
याशिवाय शैक्षणिकदृष्टया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आपला तालुका कोणत्या स्तरावर आहे, स्तर उंचवण्यासाठीचा प्रयत्न यावर विषय सहायक भाऊसाहेब काकडे,विषयतज्ञ संतोष काकडे, संदिप देशमुख, यांनी चर्चा केली. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या या बाबत आधिव्याख्याता डॉ. सतिश सातव, विषयतज्ञ चंद्रशेखर देशमुख यांनी माहिती दिली.
उपस्थितांसाठी चहापान, भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक गटशिक्षणाधिकारी डी.एस. शहागडकर यांनी केले तर आभार गटसमन्वयक एस.बी. नेव्हार यांनी मानले.
तत्पूर्वी उत्कृष्ठ कार्य केलेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा,मुख्याध्यापकांचा, उत्कृष्ठ काम करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भोकरदन तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, बहुसंख्य शिक्षक,सर्व विशेषशिक्षक, विषयतज्ञ, गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें