पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर देणे हाच पर्याय’.=अमित शहा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 25 मार्च 2018

पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर देणे हाच पर्याय’.=अमित शहा.

‘पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर देणे हाच पर्याय’.=अमित शहा.

पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि वाढत्या कारवाया लक्षात घेता आता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर दिले पाहिजे हाच एक पर्याय आता उरला आहे असे मत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नोंदवले आहे. मागील काही दिवसात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांचे प्रमाण वाढले आहे.

पाकिस्तानला भारतीय सैन्यही जशास तसे उत्तर दिले जाते आहे तरीही कारवाया थांबण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यासंबंधीचा प्रश्न पत्रकारांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना विचारला. त्यावर उत्तर देताना आता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर देणे हाच पर्याय आहे असे शहा यांनी म्हटले आहे.

सर्जिकल स्ट्राइक केला तरीही त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. भारताविरोधात पाकिस्तानच्या कारवाया थांबताना दिसत नाहीत. पाकिस्तान अजूनही भारतात दहशतवादी पाठवत आहे. त्यांच्या गोळ्यांमुळे निष्पाप लोकही मारले जात आहेत. हे आता कदापी सहन केले जाणार नाही असेही शहा यांनी स्पष्ट केले.

येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांबाबत यांच्या निकालाबाबत विचारले असता, येत्या निवडणुकांमध्ये भाजपाचाच विजय होणार आहे असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचाच विजय होईल आणि पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान होतील असेही शहा यांनी स्पष्ट केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें