भगवान महावीर जयंती निमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी.
शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधी:
जगाला अहिंसेचे तत्वज्ञान सांगणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिम्मित दि.२९ मार्च रोजी शहरातील व तालुक्यातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावे भोकरदन येथे दरवर्षी भगवान महावीर जयंती निमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढली जाते या मिरवणुकी दरम्यान जैन बांधवांच्या भावना दुखावल्या जाणार नाही व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही म्हणून प्रशाशनाने याची खबरदारी घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा असे निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर नगरसेवक संतोष अन्नदाते,भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष मयुर बाकलीवाल,गौरव जैन,संजोश बाकलीवाल,संजय धोंगडे,अमित खुळे, रोहित बाकलीवाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें