आ.मोहन फड यांच्यावतीने गरजु रुग्ण उपचारासाठी मुंबईला रवाना.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२६: पाथरी विधानसभातील वेगवेगळ्या आजाराने ञस्त असलेल्या नागरिकाना पाथरी मतदारसंघातील रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा माननारे आमदार मोहनभाऊ फड साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपचारासाठी मुंबई येथे आज दि.२६ मार्चरोजी मानवतरोड रेल्वेस्टेशन येथुन रेल्वेने मुंबईला पाठवण्यात आले.
यात पाठवण्यात आलेले रुग्ण हे मोतीबिंदू ,गर्भपिशवी व इतर आजाराच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. डी. वाय .पाटील हॉस्पिटलमध्ये मुंबई येथे रवाना करण्यात आले या सर्व रुग्णाचे सर्व खर्च आमदार मोहनभाऊ फड साहेब करत आहेत .
यावेळी रुग्णांना मानवतरोड रेल्वेस्टेशन येथे रेल्वेने मुंबईला पाठवण्यासाठी रमेश सोनटक्के ,संतोष जाधव,दिलीप धरपडे,बापू जाधव,परमेश्वर थोरे, विष्णू शिंदे,भारत शिंदे,विष्णू होंडे, पप्पू नखाते ,ओंकार अवचार हे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें