ट्रीपल तलाक बिला विरोधात मुस्लिम महिलांचा परभणीत बुधवारी मोर्चाचे आयोजन.
+जिल्हा भरातुन हजारो महिला या मोर्चाला उपस्थीत राहनार आहे.
समशेर खान.
विशेष.प्रतिनिधी.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड च्या आदेशाने अब्दुल रशिद इंजिनियर यांच्या मार्गदशना खाली परभणीत ट्रीपल तलाक बिलाच्या विरोधात 28 मार्च रोजी मुस्लिम महिंलाचां मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया वर काढण्यात येणार आहे़
महिलांनी या मोर्चात जास्त संख्येने सहभागी व्हावे या साठी महिलांच्या बैठका घेऊन आवाहन महिला समिति च्या वतीने करण्यात येत आहे़ शहरात विविध ठीकाणी आता प्रयंत 50 हुन अधिक महिलांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत़ मोर्चा साठी दोन हजार स्वयं सेवकांची टीम तैयार करण्यात आली आहे़ मोर्चात महिलांना सहभागी होण्या करीता शहरातील 500 आॅटोचालकांनी आॅटो रिक्शा निशुल्क उपलब्ध केले आहेत़ मोर्चा च्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़
मोर्चा मध्ये अंबुलंस प्रथमोपचारा ची व्यवस्था करण्यात आली आहे़ मोर्चासाठी महिला समिति च्या अध्यक्षा डॉ़ दरक्षा खांनम,डॉ़ फौजिया अमिन, कौसर परविन,सुमय्या बेगम, मारुफा बेगम, सिध्दीखा साहीबा, आएशा कौसर,नाजनिन शकिल मोहीयोद्दिन, नुदरत खानंम, खालेदा तनवीर, आएशा गाजी, डॉ़ फौजिया अमिन, आदि परिश्रम घेत आहेत.
Tezznews24 web news channel.
Editor.Anwar pathan
Contact.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें