भोकरदन येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सहात साजरी
- शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी
भोकरदन शहरातील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सोमवार दिनांक १९ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
शहरातील जुनी बाजार पट्टी भागात असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सोमवारी सकाळी साडेदहा वाजता स्वामींची महाआरती करण्यात आली. तसेच प.पु.गुरुमाऊली यांच्या आदेशाने आतंकवादापासून भारतभूमीचे रक्षण व विश्वशांती वातावरण निर्मितीसाठी सेवेकऱ्यांनी श्री स्वामी चरित्र व कालभैरवअष्टक स्तोत्र पठण केले. यात महिला सेवेकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यासह दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम देखील संपन्न झाले. शिवाय सर्व सेवेकऱ्यांनी आपापल्या घरून आणलेल्या नैवेद्य मांदियाळी महाप्रसादानंतर कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. यावेळी पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात महिला सेवेकऱ्यांसह पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो क्र.०१ भोकरदन: श्री स्वामी समर्थ केंद्रात स्वामी चरित्र व कालभैरवअष्टक पठण करतांना सेवेकरी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें