डिघोळ येथे अखंड हरिनाम सप्ताह - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 19 मार्च 2018

डिघोळ येथे अखंड हरिनाम सप्ताह

डिघोळ येथे अखंड हरिनाम सप्ताह

सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१९ मार्च २०१८
तालुक्यातील डिघोळ दे. येथे विठ्ठल भजनी मंडळ, सावता माळी भजनी मंडळ तसेच गावकरी मंडळीच्या वतीने आज दि.१९ मार्च पासुन अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व रामकथेस प्रारंभ होत असुन सप्ताह ची सांगता दि.२६ मार्च रोजी संपन्न होणार आहे.

   या कथेचे प्रवक्ते ह.भ.प.रामायणाचार्य लक्ष्मण महाराज आनंदे यांच्या मधुर वाणीतुन कथेचे सार सांगणार आहेत. दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दु. १ ते ४ श्री. राम कथा, हरिपाठ,रात्रो ९ ते ११ हरिकिर्तन होणार आहे.
या निमित्त दि.१९ मार्च रोजी ह.भ.प.लक्ष्मण महाराज आनंदे यांचे हरि कीर्तन,दि.२० रोजी ह.भ.प.बापु महाराज उखळीकर दि.२१ रोजी ह.भ.प हानुमान महाराज आवलगावकर, दि.२२ रोजी ह.भ.प.विलास महाराज गेजगे दि.२३ रोजी ह.भ.प.प्रभाकर महाराज शास्त्री दि.२४ रोजी ह.भ.प.बंडोपंत महाराज कोद्रिकर दि.२५ रोजी राम जन्मोत्सव निमित्त सकाळी १० ते १ या वेळेत  ह.भ.प.विनायक महाराज गुट्टे यांचे कीर्तन होणार असुन याचं दिवशी रात्रो ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. विष्णु महाराज यांचं हरिकीर्तन होणार आहे.दि.२६ रोजी ह.भ.प.वेदसंपन्न वेदांताचार्य बापुदेव महाराज बेलगावकर  यांचे सकाळी ११ ते १ वेळात काल्याचे किर्तन होणार आहे. कीर्तनानंतर सामुदायीक महाप्रसाद होणार आहे.या धार्मीक कार्यक्रमाचा भावीक भक्तानी  लाभ घ्यावा असे अवाहन समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें