डिघोळ(दे.) येथील मानिक हजारे यांचे थोर दातृत्व - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 19 मार्च 2018

डिघोळ(दे.) येथील मानिक हजारे यांचे थोर दातृत्व

डिघोळ(दे.) येथील मानिक हजारे यांचे थोर दातृत्व

*वैयक्तिक संग्रहातील पुस्तके ग्रंथ वाचन चळवळीस भेट दिली

सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१९मार्च २०१८
तालूक्यातील मौ.डिघोळ (दे.) येथील दै.पुढारीचे एजंट मानिक नागनाथराव हजारे यांनी त्यांच्याकडे असलेली पुस्तके ग्रंथ वाचन चळवळीस भेट दिली.

  • मौ.डिघोळ (दे.) येथे केस कर्तनाचा व्यवसास करनारे व दै.पुढारी या वृत्तपत्राचे एजंट असलेले मानिक हजारे यांना शालेय शिक्षण घेत असल्यापासुनच वाचनाची आवड आहे. आजही बाहेरगावी गेल्यास मी किमान एक पुस्तक विकत घेऊन वाचतो; व वाचुन झालेले पुस्तक संग्रही ठेवतो असे हजारे यांनी आमच्या प्रतिनिधीसी बोलतांना सांगीतले. गावातील इतर व्यक्तीही माझ्याकडून पुस्तके वाचना साठी नेतात. खरा वाचक पुस्तक वाचुन परत करतो. मात्र काहीजन घेऊन गेलेले पुस्तक परत करत नाहीत असा अनुभव आल्याचेही त्यांनी सांगीतले. चळवळीच्या माध्यमातून तालूक्यातील शाळा, महाविद्यालयांना भेट देण्यासाठी आज त्यांनी त्यांच्या संग्रहातील कांही पुस्तके चळवळीस भेट दिली आहेत. यावेळी ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर व सदस्य तथा पत्रकार राधेश्याम वर्मा यांनी पुस्तक भेट स्विकारली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें