महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्य योजनेचे कार्ड दाखवून गोव्यातील रुग्णालयात घेता येणार उपचार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 मार्च 2018

महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्य योजनेचे कार्ड दाखवून गोव्यातील रुग्णालयात घेता येणार उपचार.

महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्य योजनेचे कार्ड दाखवून गोव्यातील रुग्णालयात घेता येणार उपचार.

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग वगैरे भागात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सरकार तर्फे राबविली जात असून, गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालय (गोमेकॉ) हे आता प्रथमच या योजनेचा भाग होणार आहे. परिणामी महाराष्ट्रातील लोकांना या योजनेच्या लाभाचे कार्ड वापरून गोव्यातील गोमेकॉ  रुग्णालयात उपचार घेता येतील.गोमेकॉ हे सरकारी रुग्णालय असले तरी, पूर्ण कोकणपट्टय़ात खासगी रुग्णालयकडे देखील ज्या सुविधा नाहीत, त्या सगळ्य़ा गोमेकॉ रुग्णालयमध्ये आहेत. हृदयरोगावरील उपचार येथे केले जातात. बायपाससह हृदयावरील अन्य सर्व प्रक्रिया आणि श क्रिया गोमेकॉत केल्या जातात. गोमंतकीयांसाठी ह्या सगळ्य़ा सेवा व उपचार मोफत दिले जातात. परप्रांतीयांकडून 20 टक्के शूल्क आकारावे असे प्रथमच ठरले व गेल्या जानेवारी महिन्यापासून अंमलबजावणी सुरू झाली. अनेक विदेशी पर्यटक तसेच कारवार ते सिंधुदुर्गर्पयतचे लोक गोमेकॉत येऊन उपचार घेतात. त्यांना थोडे शुल्क लागू झाल्यामुळे नाराजीची भावना सिंधुदुर्ग मधून येणे सुरू झाली. दीपक केसरकर, नितेश राणे आदी अनेकांनी सिंधुदुर्ग मधील लोकांकडून गोव्यात शुल्क आकारणी केली जाऊ नये अशी मागणी सुरू केली. मात्र गोवा सरकार ठाम राहिले.आम्ही कुणालाच कधी उपचार नाकारले नाही. परप्रांतांमध्ये जे वाहन अपघात होतात, त्या अपघातांमधील रुग्णांवर तातडीने गोव्याच्या रुग्णालयात मोफतच उपचार केले जातात, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी अलिकडे वारंवार सांगितले. मात्र सर्वच प्रकारच्या रुग्णांवर गोमेकॉत उपचार मोफत केले जावे, अशी मागणी येऊ लागली. गोमेकॉमध्ये मुंबईतील डॉक्टरांच्या सहाय्याने किडनी रोपणाच्याही शस्त्रक्रिया पार पडतात. आतापर्यंत सोळा गोमंतकीय रुग्णांवर मूत्रपिंड रोपणाच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. गोमेकॉत यापुढे कॅन्सर रुग्णांवरील उपचार सुविधाही सुरू केली जाणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी गोव्याला 45 कोटींचा निधी मंजुर केला आहे. दरम्यान, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गोवा वमहाराष्ट्रातही भाजप सरकार अधिकारावर आहे. सिंधुदुर्गमधील रुग्णांवर गोमेकॉ रुग्णालयात पैसे खर्च करण्याची वेळ येऊ नये, या मागणीविषयी राणे व फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यासाठी ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेखाली गोमेकॉ रुग्णालय रुग्णांना मोफतसुविधा देईल, असे ठरले. म्हणजेच या योजनेच्या लाभाचे कार्ड गोमेकॉत रुग्णांनी स्वाईप करावे. थेट पैसे जमा होतील. महाराष्ट्र सरकार खर्चाचा भार उचलेल. यामुळे गोमेकॉचाही महसूल वाढणार आहे. गोमेकॉत आम्ही स्वाईप यंत्रे उपलब्ध करणार आहोत. सिंधुदुर्ग मधील रुग्णांचाप्रश्न आता सुटला आहे, असे मंत्री राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें