संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशउपाध्यक्षपदी छगन शेरे यांची फेरनिवड
सेलू :- गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून तरूणांचे नेतृत्व करणारे छगन शेरे यांची मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशउपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
पुणे येथील शाहू महाविद्यालयात नुकतीच संभाजी ब्रिगेडची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदी प्रविणदादा गायकवाड यांची तर प्रदेशउपाध्यक्षपदी छगन शेरे यांची फेरनिवड करण्यात आली.
छगन शेरे यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच सामाजिक चळवळीत सामुहिक विवाह सोहळा, कृषी प्रदर्शन असे लोकउपयोगी उपक्रम यशस्वीरित्या राबवून जनसामान्यांमध्ये आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट संघटन कौशल्य असल्याने शेरे यांच्याकडे हजारो तरूणांची फौज आहे.
या निवडीबद्दल शेरे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें