सोनपेठ शहरातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडले
*अण्णाभाऊ साठे चौकातील घटना
सोनपेठ(राजेश खेडकर)शहरातील मुख्य बाजार पेठेत असनारे दोन दुकाने फोडुन चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल व गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे पोलिसासमोर पुनः एकदा मोठे आव्हान ऊभे राहिले आहे.
दि.८ मार्च च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अण्णाभाऊ साठे या वर्दळीच्या बाजार पेठेतील असलेल्या मे.बालाजी हार्डवेअर्स व श्रीरंग कलेक्शन या दोन दुकानांवरील पत्रे कापून हजारो रुपयांचा माल व रोख रक्कम लंपास केली. शहरातील व्यापरी संतोष शेटे यांचे बालाजी हार्डवेअर च्या दुकानातून नगदी रोख व गजानन लांडे यांच्या श्रीरंग कलेक्शन या कापड दुकानातील नगदी व शर्ट, पँट, साड्या असा एकुण २० हजार २०० रुपयाचा माल लंपास केला. या दोनीही घटनेनंतर सोनपेठच्या बाजारपेठेत खळबळ उडाली असुन रात्री नियमित पोलिस गस्त असताना चोरट्यांनी धाडसी चोरी करत पोलिसांसमोर मोठे अव्हान ऊभे केले आहे.
दुकान मालक बालाजी शेटे व लांडे यांच्या फिर्यादिवरुन सोनपेठ पोलीसात गन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें