बरांजला साबळे येथील सर्वसामान्यांचा नेता पंडीतराव साबळे काळाच्या पडद्याआड
शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधी:-
जो आवडी माणसाला, तोच आवडी’ देवाला या म्हणी प्रमाणेच घडल आहे.
भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील माजी सरपंच तथा काँग्रेसचे नेते पंडितराव साबळे पाटील यांचे आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास मुबंई येथे दिर्घ आजाराने निधन झालं आहे
गेल्या महिन्याभरापासून साबळे यांनी प्रकृती बिघडली होती त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते,आजार जास्त वाढल्याने त्यांना मुबंई येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते, मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अचानक त्यांची प्राण ज्योत मावळली, ही बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे,
साबळे यांनी बरंजळा साबळे गावाचे सरपंच म्हणून 1997 पासून सलग 15 वर्ष
काम पाहिले, सोसायटीचे दहा वर्षे चेअरमन,तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात त्यांच्याकडे तालुका अध्यक्ष म्हणून अडीच वर्षे राहिले, गावातील तसेच परिसरातील गोरगरिबांचे कामे करून त्यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला,
त्यांच्या निधनाने परिसरात मोठ्या प्रमाणावर शोकळला पसरली आहे. त्यांना त्यांच्या मुळगावी बरंजळा साबळे येथे अंतसंस्कार करण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें