सोनपेठ येथे जागतीक ग्राहकदिन सादरा
सोनपेठ(राजेश खेडकर)येथील जिल्हा परीषद प्रशालेत जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करन्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुमित लांडे हे होते तर प्रमुख वक्ते डॉन बॉस्को टेक सोसायटीचे जिल्हा समन्वयक किरन पतंगे व प्रमुख पाहुणे अ.भा.ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष किरन स्वामी, तालुका सचिव राधेश्याम वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जग प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख वक्ते किरन पतंगे यांनी ग्राहक व उपभोक्ता या विषयी मार्गदर्शन केले तर किरन स्वामी, संदिप लष्करे व सुमित लांडे यांनी ग्राहकांच्या अडीअडचणी व उपाय योजनावर प्रकाश टाकला. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकिय सदस्य पदी निवडीबद्दल किरन स्वामी व जर्नालिस्ट युनियन अॉफ महाराष्ट्र राज्य कार्यकारीनी सदस्यपदी निवडीबद्दल राधेश्याम वर्मा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक सुधाकर कदम, गोरवे, स्वामी, श्रीमती रोडे, श्रीमती राठोड आदिंसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाते सुत्रसंचालन रिटेल विषयाचे प्रशिक्षक शेख वाजेद यांनी तर आभार शुभम भोसले यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें