सेलुत साई समाधी शताब्दी सोहळा
◆धार्मिक कार्यक्रम, नामवंत गायकांची हजेरी
समशेर खान.
सेलु(प्रतिनिधि) :येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने गुढीपाडवा व श्रीराम जन्म पर्वानिमित्त संगीतमय श्रीमद भागवत कथा व विविध धार्मिक कार्यक्रमासह भक्तीसंगिताच्या कार्यक्रमाचे आयोजन 18 ते24 मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. दरम्यान या सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत गायक भक्तीसंगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत. येथील महेश नगरातील श्री साईबाबा मंदिरात 18 ते 24 मार्च या कालावधीत ह. भ. प. नंदकिशोर पुराणिक गोंदिकर महाराज यांची संगीतमय श्रीमद भागवत कथा दु. 12 ते 4 या वेळेत होणार आहे. 18 मार्च रोजी सकाळी 10 वाजता श्री साई चरणी शहरातील 251 जोडप्यांच्या उपस्थितित महाभिषेक होईल यावेळी हभप नंदकिशोर महाराज गोंदीकर, आचार्य नागनाथ शास्त्री विडोळीकर, तात्यागुरु गोळेगावकर यांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास गुढी पाडव्या निमित्त हिंदी मराठी भक्ती गीतांची स्वर प्रतिपदा ही मैफिल नरेंद्र राठोड हे सादर करणार आहेत. 19 मार्च रोजी श्री रोकडीया हनुमान मंदिर मोंढा व सेलु प्रभात फेरी मंडळाच्यावतिने सायंकाळी 5:30 वाजता संगीतमय 108 हनुमानचालिसा पाठ होणार आहे. 20 मार्च रोजी हभप दिपक महाराज बादाडे यांचे सायंकाळी 7:30 वाजता किर्तन होणार आहे. 21 मार्च रोजी त्यागराज खाडीलकर यांचे एक प्रसन्न संगीत नाटक "मला वेड लागले संतांचे" सादर होणार आहे. 22 मार्च रोजी पार्श्वगायक हर्षिद अभिराज यांचे हा भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे. 23 मार्च रोजी अजीत कडकडे प्रस्तुत "तुझे नाम ओठी" हा भाव गीत, भक्ती गीत व पारंपारीक अभंगाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. 24 मार्च रोजी हभप प्रशांत महाराज खानापुरकर यांचे किर्तन तर 25 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत रामजन्मोत्सवानिमित्त हभप शिवाजी महाराज खवने यांचे काल्याचे किर्तन होईल.महाप्रसाद व महाआरतीनी सोहळ्याची सांगता होणार आहे.कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहण्याचे अवाहन श्री साईबाबा मंदिर संस्थानच्या वतिने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें