आडुळ एस.टि.गावात येत नसल्याने प्रवाशांचे हाल.
राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज धावणाऱ्या एस टी बसेस आडूळ गावामध्ये न येता गावा बाहेरून गेलेल्या बाह्य रस्तावरच बायपासमार्गे आडरानात ( जंगलात ) प्रवाशांना उतरून धावत असल्याने ग्रामस्थांना तसेच जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना एक किलोमीटर अंतरावर उतरून पायपीट करावी लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे.धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर आडूळ हे मुख्य बाजार पेठेचे मोठे गांव असून व्यापारी वर्गाचे गांव म्हणून ओळखले जाते.परिसरातील पन्नास खेड्यापाड्यातील नागरिकांचा दररोज या गावाशी संपर्क येतो.महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने दररोज हजारो खाजगी वाहनांसह राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस लातूर,सोलापूर,बीड,अंबड,उस्मानाबाद,पंढरपूर,तुळजापूर,परळी,अहमदपूर,इचलकरंजी,सांगली,धुळे,अंबेजोगाई,माजलगाव,गाणगापूर, हुबळी,बसवकल्याण आदी लांब पल्ल्याच्या ठिकाणासह परराज्यात धावतात.राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व जलद ( विनावाहक सोडून ) एस टी बसेस गाड्यांना आडूळ येथे मागील बऱ्याच वर्षानुवर्षे पासून बसथांबा देण्यात आला आहे.यापूर्वी देखील बायपास होण्याच्या अगोदर येथील बसस्थानकावर बसेस थांबत होत्या परंतु सध्या या महामार्गाचे नवीन रुंदीकरणाचे काम झाल्याने तसेच आडूळ गावाच्या बाहेरून बायपास गेल्याने या रस्त्यावरूनच एस टी चे चालक - वाहक गावात वाहन न आणता ग्रामस्थांना तसेच प्रवाशांना गावापासून एक किलोमीटर असलेल्या आडरानात ( जंगलात ) सोडून बाहेरूनच सुसाट वेगाने धावत आहे.यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.आडूळ येथून दररोज औरंगाबाद येथे शहराच्या ठिकाणी व्यापारी खरेदीसाठी,कामगार कामासाठी,विविध शासकीय विभागातील कर्मचारी तसेच विद्यार्थी वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षणासासाठी यांच्यासह इतर हजारो प्रवाशी ये - जा करतात.प्रवाशांना जंगलात उतरून मोकळे होत असल्याने सतत त्यांच्यात व प्रवाशांमध्ये वाद होत आहे.कधी कधी तर सिडको अथवा पाचोड येथुन बसस्थानकावरून प्रवाशी बसल्यावर गाडी आडूळ गावात जाणार नाही असा दम ही चालक/ वाहक प्रवाशांना भरत आहे.यामुळे नागरिकांमध्ये एस टी प्रशासना विरुद्ध रोष व्यक्त होत आहे.यावरून सध्या आडूळ बसस्थानकाचे लाल परीला वावडे झाल्याचे दिसून येत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गावाच्या बाहेरून ( बायपास मार्गे ) जाणाऱ्या बसेस गावातून घेऊन जाण्यासाठी कडक सूचना द्याव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांसह त्रस्त प्रवाशांनी केली आहे.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें