डॉ.आंबेडकर शेकय्रांसाठी आयुष्यभर लढले =डॉ.प्रल्हाद लुलेकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 28 मार्च 2018

डॉ.आंबेडकर शेकय्रांसाठी आयुष्यभर लढले =डॉ.प्रल्हाद लुलेकर.

डॉ.आंबेडकर शेकय्रांसाठी आयुष्यभर लढले =डॉ.प्रल्हाद लुलेकर.

समशेर खान.
सेलू : 'देशाच्या सगळ्या मुलभुत प्रश्नांवर डॉ.बाबासाहेब आबंडकरांनी चिंतन करून शेती आणि शेतकय्रांचे प्रश्न सुटले तरच देशातील प्रश्न सुटतील हे केवळ त्यांनी विचारच मांडले नाहीत तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शेतकय्रांच्या हितासाठी आयुष्यभर लढले.' असे मत नूतन महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमान आयोजित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पुरस्कृत कै.के.एम.देशमुख व्याख्यानमालेत नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात सोमवार दि.२६ रोजी प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी 'दलितेतरांसाठी आंबेडकर ' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून   बोलतांना  व्यक्त केले.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते.तर मंचावर संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर,तहसीलदार स्वरूप कंकाळ,प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,उपप्राचार्य यादवराव गायकवाड यांची उपस्थिती होती.
       पुढे बोलतांना प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  जात,धर्म,भाषा यांच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टीने देशातील सर्व  कामगार,स्ञिया,सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी यांच्या न्याय,हक्कासाठी संघर्ष केला. डॉ.बाबासाहेब आबंडकर हे शेतकय्रांचे खरे नेते होते. त्यांनी  शेकय्राचा मुलगा पंतप्रधान झाला पाहिजे ही भुमिका ठामपणे  मांडली. धरणांना पर्यटन स्थळांचा दर्जा प्राप्त व्हावा.भविष्याच्या दृष्टीने पाणी,विजेच महत्व लक्षात घेऊन योग्य वापर झाला पाहिजे. हे डॉ.बाबासाहेब आबंडकरांचे विचार ही, डॉ.लुलेकरांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य यादवराव गायकवाड यांनी केले. सुञसंचालन प्रा.उत्तम राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.महेंद्र शिंदे यांनी केले.

 फोटो ओळी :=!!येथील नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात कै.के.एम.देशमुख व्याख्यानमालेत बोलतांना डॉ.प्रल्हाद लुलेकर मंचावर स्वरूप कंकाळ,डॉ.एस.एम.लोया,प्राचार्य डॉ. व्ही.के.कोठेकर,प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,प्रा.यादवराव गायकवाड,प्रा.उत्तम राठोड.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें