रफिक काॅलनी भोकरदन येथे नगरपालिके कडून दुषित पाणी पुरवठा
[अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष, शहरातील नागरिकांच्या आरोग्यला धोका]
शे.सलिम.भोकरदन शहरातील रफिक काॅलनीत दुषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यला धोका निर्माण झाला आहे, मंगळवार दि.13 ला नळाला पाणी आले पण अस्वच्छ आणि घाण, हे पाणी पिणे योग्य तर नाहीच वापरण्यात सुद्धा येणार नाही, हे पाणी प्यायल्याने लहान मुलांत घोकला, ताप, गॅस्ट्रोचे प्रमाण वाढले आहे आणि मोठ्या माणसांना सुद्धा दुषित पाण्यामुळे आजारी पडत आहे, अता प्रश्न असा पडला की ह्या दुषित पाणीने स्वयंपाक कसे करावे आणि तहान लागल्यावर काय प्यायचे? त्या मुळे फिल्टर पाणी वाले, टँकर वाले, नागरिकांची महाग पाणी विकून नागरिकांना लुटत आहे, भोकरदन नगरपरिषद ने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, भोकरदन नगरपरिषदेतील पाणी पुरवठा अधिकारी राजु जाधव यांच्याशी काही नागरिकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तर त्यांनी सांगितले की माणूस पाठवतो.. आणि फोन डीस्कनेकशन केले पण त्यांनी पाठवलेला माणूस तर आलाच नाही, त्यामुळे रफिक काॅलनीतील नागरिकांना फार त्रास झाला, स्वच्छ आणि निर्मळ पाणीपुरवठा करण्यात यावे अशी मागणी अश्फाक कुरेशी, शेख अफसर चौधरी, आणि रफीक काॅलनीचे नागरिकांनी भोकरदन नगरपरिषद कडे केली आहे,

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें