*प्रासंगिक मुलाखत*डॉ.एस.जे.अली.*
*पोलिओ पर्यवेक्षक, परभणी*
आज दि.14 मार्च 2018 , रोजी पारडी येथील अंगणवाडीत एक डॉ.व काही परिचारिका पोलिओ लसीकरण कार्यक्रमानिमित्त आले होते .शाळेच्या आवारात अंगणवाडी असल्याने आम्हाला लगेचच लक्षात आलं .
काही मुलं म्हणू लागले ,सर डॉक्टर ही आले आहेत . आपण त्यांना बोलूयात का आपल्या शाळेत ? तेव्हा माझ्या लक्षात आलं की "मुलांत आता शोधक वृत्ती निर्माण झाली आहे .ते सतत नाविन्याचा , नव्या व्यक्तीचा शोध घेत आहेत .परिसरातील नवं नवं ते शोधत आहेत."
मलाही आनंद झाला की, आपन मुलांच्या मनात लावलेलं बीज आता बाळसे धरत आहे .आणि मुलं आता दररोज नवं शोधत आहेत .
लागलीच आमच्या शाळेची मुलींची प्रतिनिधी, *काजल राठोड अंगणवाडीत जाऊन मा.डॉ अली यांना शाळेत येण्याची विन्नती केली* .तेव्हा डॉ.अली यांनी होकार दर्शविला व आमची बाकी टीम कामाला लागली आणि तयारी केली .
पुष्पगुछ तयार करणे, फलक लेखन, प्रास्ताविक, संचलन अशी सर्व तयारी आता मुलंच करत आहेत .मला फक्त मार्गदर्शक म्हणून काम करावे लागते .
*मा.डॉक्टर अली* यांचे वर्गात प्रवेश होताच सर्व चिमुकल्यानी टाळ्या वाजवून स्वागत केलं.नंतर मा.डॉ अली यांचं *स्वागत काजल, अजय, व शिक्षक मंगेश नरशिंगकर यांनी पुष्प गुछ देऊन केलं*
त्यानंतर प्रस्तावनेत राधाने, आपल्या शाळेची व उपक्रमांची माहिती दिली व मान्यवरांना भारावून टाकलं. नंतर मा.डॉ।अली यांनी आपला परिचय दिला .ते म्हणाले, *मी डॉ.एस जे अली .सध्या पोलिओ पर्यवेक्षक म्हणून काम पहात आहे .सेलू येथे माझा स्वतः चे रुग्णालय आहे.मला तीन भाऊ आहेत .मी सेलू येथे रहातो*
*ओम-सर आपलं शिक्षण कुठं व कसं झालं*
*डॉ.-माझा बालपण म्हणजे म्हणजे कष्टाचं व हलाखीच्या परीस्थित गेलं.मला दहावी होईपर्यंत पायात चप्पल नव्हता ,एकच ड्रेस असायचा ,माझे आई वडील खूप कष्ट करायचे .पण मी खूप जिद्दीने शिकलो*
*आज मी चारचाकी ने फिरतो , छान घर आहे , मुलं उच्च शिक्षण घेत आहेत . ह्याचा मला आनंद आहे . हे सर्व शिक्षणाने बद्दल म्हणून बाळांनो शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत रहा*
*काजल- तुमच्या दवाखान्यात येणाऱ्या आजारी माणसांकडे पैसे नसतील तर तुम्ही त्यांना तपासता का?*
*डॉ.-मुलांनो मी गरिबी जगलो आहे .त्यामुळे मला माहित आहे की अश्या आजारी माणसाला कशी मदत करावी . मी आज ही फक्त20 रु चं तपासणी फी घेतो .याच कारण हेच आहे .*
*अजय-पोलिओ विषयी माहिती सांगा.*
*डॉ.- पोलिओ हा संसर्गजन्य आजार नाही किंवा आनुवंशिक ही नाही .हा विशिष्ट प्रकारच्या डास चावल्यायमुळे होतो. आणि हा प्रकर्षाने बालकांना होतो , मोठया माणसांनाही होतो व त्याला चिकणगुनिया नावाने संबोधतात*
*पोलिओ ज्या डासांमुळे होतो तो डास 15 फूट वर उडतो मात्र 200 किमी दूरपर्यंत प्रवास करू शकतो .म्हणून जेथे असा पेशन्ट अथवा डास आढळला जातो त्याच्या पासून 200 किमी परिसरात पोलिओ मोहीम सक्रिय केली जाते*
*मनीषा- तुमचे भाऊ काय करतात?*
*डॉ.- मला नोकरी मिळाली व नंतर मी माझ्या भावा ना शिक्षणात मदत केली . व ते आता शासकीय नोकरीस आहेत*
*महेश- सर तुमचं वेगळंपण काय?*
*डॉ- मी माझ्या कडे येणाऱ्या प्रत्येक रोग्याला अतिशय प्रेमाने तपासतो व बरा करतो*
*शुभम- तुम्ही किती तास काम करत असतात?*
*डॉ-शासकीय सेवेनंतर मी स्वतः च्या रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत काम करतो*
*राधा-सर आपण आम्हाला शेवटी कोणता सल्ला द्याल*
*डॉ- मुलांनो जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसू नका, आज जसं माझ्याकडून नवं नवं एकूण घेतलात तसं भरपूर माहिती मिळवा .खूप काही शिका , गरिबी हा शाप समजू नका , तिला संधी मानून तीच सोनं करा*
*आणि सर्वात महत्वाचं आई वडिलांना विसरू नका त्यांची सेवा करा!*👍💐
शेवटी राधा शेळके व काजल राठोड यांनी आभार पर आपले मनोगत व्यक्त केले .
*युवराज माने*
*जि प शाळा पारडी*
*ता सेलू जि परभणी*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें