कान्हड येथील जि.प.शाळेवर केंद्रप्रमुखाची भेट शिक्षक मात्र गैरहजर
शेख नईमोद्दीनकौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथुन आवघ्या चार की.मी.अंतरावरील कान्हड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर 13 मार्च मंगलवार रोजी सकाळी 8 वाजता केंद्रप्रमुख मधुकर काष्टे यांनी अचानक भेट दिली आसता या शाळेतील सर्व विद्यार्थी हाजर होते मात्र शिक्षक गैरहजर आसल्यांचे पहावयास मीळाले.
कान्हड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे या शाळेत 189 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पांच शिक्षकांची नेमनुक करण्यात आली आहे
उन्हाळा सुरू होताच तापमान वाढत आसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य ची काळजी घेत जिल्हा परिषद व शिक्षण विभागाने 1 मार्च पासुन सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शाळा भरवीण्याचा निर्णय घेतले आहे व त्या निर्णयानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू आहेत
येथील शाळेत केंद्रप्रमुखाने 13 मार्च मंगलवार रोजी सकाळी आठ वाजता अचानक भेट दिल्याने याच दरम्यान शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते पाचही शिक्षक मात्र गैरहजर असल्यांचे निदर्शनास आले त्या नंतर 8:30 ते 9:30 च्या दरम्यान तिन शिक्षक शाळेवर हजर झाल्याने ग्रमस्थानी केंद्रप्रमुखासमोर संताप व्यक्त करत या पाचही शिक्षका कारवाई करण्याची मागणी केली
चौखट
अधिका-यांचेही दुर्लक्ष
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शाळेवर शिक्षक वेळेवर उपस्थित राहत नाही तर कधी शाळेवर उपस्थित राहुनही विद्यार्थ्यांनवर लक्ष देत नाही या सर्व बाबीकडे वरिष्ठअधिका-यानी लक्षात देण्याचे अत्यंत गरज आहे मात्र हे अधिकारी दुर्लक्ष करतांनी दिसत आहे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मीळावे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती व्हावी या साठी लाखो रूपये खर्च केले जात आहे परंतु काही शिक्षक याकडे दुर्लक्ष करीत आसतील तर त्यांचा दुर्लक्षपना खपुन घेतला जानार नाही व नियामत बसेल ते कारवाई करण्यात येईल
-भावनाताई नखाते,शिक्षण सभापती
गटशिक्षण अधिकारी कार्यालयात 14 मार्च बुधवार रोजी या पाचही शिक्षाचे अहवाल सादर केले व त्याच्यावर काय कारवाई करायची हे गटशिक्षण अधिकारी व वरिष्ठ अधिकारी ठरवतील
केंद्रप्रमुख मधुकर काष्टे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें