खंडणी मागितल्या प्रकरणी भैय्या देशमुखला एक दिवसाची पोलिस कोठडी.
माजी उपमुख्यमंत्री अजित दादांना राजीनामा देवुन घरी बसवलेला जेल मध्ये.
पंढरपूर:- ७२ लाखांची खंडणी मागितल्याने अटक करण्यात आलेले जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैय्या देशमुख यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित दादांना राजीनामा द्यायाला लावून घरी बसवलेले देशमुख आज स्वतः जेल मध्ये बसले आहेत.दाखल गुन्हे मागे घेवून , आणखी गुन्हे दाखल न करण्यासाठी ७२ लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा गुन्हा आज गुरुवारी भैय्या देशमुख, सचिन कारंडे , अनिल झुंजार आणि एका अज्ञात व्यक्ती विरोधात विजया कोळी यांनी दाखल केला होता.
पोलिसांनी तात्काळ भैय्या देशमुख, सचिन कारंडे, अनिल झुंजार यांना अटक केली. तपास अधिकारी सपोनि शाम बुवा यांना आरोपींना न्यायाधीश अदरवाड यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. फक्त खंडणी मागितल्याचा आरोप असल्याने कोणताही मुद्देमाल हस्तगत करायचा नसल्याने एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपल्या आंदोलनाने सरकारला सळो की पळो करुन सोडणारे भैय्या देशमुख खंडणी प्रकरणात अडकले आहेत. उजणीचे पाणी कालव्यातून सोडावे यामागणी साठे भैय्या देशमुखांनी मुंबईत १०० दिवस आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाची खिल्ली उडवता माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी इंदापूरच्या सभेत धरणार मुतन्याची भाषा केली होती. यावरून अजित दादा टीकेचे धनी झाले होते. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देवून घरी बसावे लागले होते. तसेच अजित दादांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ बसुन आत्मक्लेश करुन घेतला होता. कॉंग्रेस आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यात भैय्या देशमुख यांचा खारीचा वाटा आहे. असा शेतकरी नेता आज खंडणी प्रकरणात जेलची हवा खात आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें