- मारवाडी समाजाचा गणगौरीचा सण उत्साहात साजर
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२१मार्च २०१८
शहरात प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी पारंपारिक पद्धतीने मारवाडी समाजातील स्त्रियांनी श्री गणगौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
शहरातील मारवाडी समाजातील श्री गणगौरीचा सण तिथी प्रमाणे सप्तमीच्या दिवशी प्रारंभ होतो. या दिवशी श्री गणगौरी च्या समोर एका कुंड्यात शेतातील काळ्या मातीत गहू पेरले जातात. या नंतर १५ दिवस समाजातील सर्व महिला कुंड्यातील पेरलेल्या धान्याचे व श्री गणगौरीच्या प्रतिमेचे पूजन करून व विधीवत त्यांचे लग्न लावतात. लग्नानंतर सामुहिक भोजनाचा कार्यक्रम हेऊन १६ व्या दिवशी श्री गणगौरी सह ते धान्य घेऊन शहरातील मुख्य मार्गाने वाजत गाजत त्यांची शोभा यात्रा काढण्यात येते. या शोभा यात्रेत समाजातील सर्व महिला पारंपारिक वेशभूषा परिधान करतात. यात्रेत जागोजागी फुगडी, गर्बा इत्यादी पापंपारीक नृत्यप्रकाराचे सादरिकरन करतात. शेवटी धान्याचे व कुंडाचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात येते. यावर्षीही शोभा यात्रेत मारवाडी समाजातील वृद्ध, महिला व मुलीचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें