योग गुरु रामदेव बाबा यांच्या हस्ते सेलु येथील योगपटू अपूर्व कुलकर्णीचा सत्कार
सेलू (समशेर खान )योग सोसायटी महाराष्ट्र यांच्या विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात भरभरून प्रतिसाद मिळाला. राज्य स्तरीय योग स्पर्धेला आठ विभागातून तीन वयोगटात मुले व मुलींच्या स्पर्धा पूणे येथे यशस्वी संपन्न झाल्या. नूतन विद्यालय सेलूच्या पाच स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून वयोगट दहा ते पंधरा या वयोगटात अपूर्व यशवंत कुलकर्णी या योगपटूने राज्य स्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोलापूर येथे पार पडला. अपूर्व कुलकर्णी यास चषक , प्रमाणपत्र, व रू.21000 स्वामी रामदेव बाबा , खासदार हेमा मालिनी, अमृता फडणवीस व ईतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी योगपटूंचे चित्त थरारक योगासन प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अपुर्व ने आज पर्यंत 6 राज्य व 2 शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेत कास्यपदक प्राप्त करून सेलू शहरांचे नावलौकिकात भर पाडली आहे.अपूर्वच्या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष अॅड व्ही. एस. खारकर चिटणीस डी. के. देशपांडे सहचिटणीस डाॅ. व्ही. के. कोठेकर, जयप्रकाश बिहाणी मुख्याध्यापक के. व्ही. वाघमारे उपमुख्याध्यापक ए. बी. कुलकर्णी प्राचार्य शरद कुलकर्णी पर्यवेक्षक अशोक गाजरे, मा. मा. सुर्वे जिल्हा क्रीडा अधिकारी सी. व्ही. साखरे, धोंडीराम सेप व पतंजली योग समिती सेलू यांनी अभिनंदन केले. अपूर्व यास डी डी सोन्नेकर गणेश माळवे, सतीश नावाडे, प्रशांत नाईक नागेश कान्हेकर सौरभ देशपांडे स्वाती देशपांडे यानी मार्गदर्शन केले.
सोलापूर येथे राज्य योगासन स्पर्धेत रौप्य पदक विजेता अपूर्व कुलकर्णी व डि.डी. सोन्नेकर यास चषक , प्रमाणपत्र, व .21000 रू, स्वामी रामदेव बाबा , राठी मान्यवरांच्या हस्ते स्विकारताना.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें