घरात घुसून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सेलू :- तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे येथे सौ. सुनीता दगडू बनसोडे (वय40) या महिलेला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सेलू पोलिसांनी संदीप बालासाहेब बनसोडे व बालू लहू गोन्टे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी ता. 27 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे सुनीता व पती दगडू बनसोडे हे दोघे शेती व्यवसाय करून आपल्या स्वतःच्या घरात राहतात. गेल्या अनेक दिवसापासून जागेच्या वादावरून सदर आरोपी विरूद्ध वाद चालू होता. याप्रकरणी सुनीता बनसोडे यांनी कोर्टात व पोलिसांत तक्रार दाखल करून न्याय मागीतला होता. न्याय प्रक्रिया प्रलंबित असतानाच अचानक मंगळवारी ता 27 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संदीप बालासाहेब बनसोडे व बालू लहू गोन्टे यांनी संगनमत करून त्यांच्या इतर साथीदारासह दरवाजा तोडून सुनीता बनसोडे यांच्या प्रवेश केला. आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिली असे म्हणत सुनीता व पती दगडू बनसोडे यांना बेदम मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार सुनीता बनसोडे यांनी दिल्यावरून संदीप बनसोडे, बालू गोन्टे व त्यांच्या इतर साथीदारांच्या विरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात भादवी 452, 323, 504, 506 / 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोप अद्याप अटक करण्यात आले नाहीत. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजीब पठाण करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें