श्रीराम प्रतिष्ठान मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
*तारांगण शो ला विद्यर्थ्यांचा भरभरून प्रतिसाद.*
सेलू . (दि. 28)येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित रॉयल प्रिन्स अकॅडमी सीबीएसई च्या वतीने जागतिक नोबेल पुरस्काराचे मानकरी थोर भारतीय भौतिक शास्त्रज्ञ डॉ. सी वी रमण यांच्या कार्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन ता २८ फेब्रुवारी दरवर्षी प्रमाणे उत्सहात रॉयल प्रिन्स अकॅडमी सीबीएसई विद्याविहार संकुल येथे पार पडला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे प्रमुख पाहुणे प्रा. विष्णू जाधाव , प्रा. संगाई , विष्णू पांचाल प्रमुख उपश्तिथी संस्थेच्या सचिव डॉ. सौ. सविता रोडगे ,प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्या प्रिती सॅम्युअल, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापक शालिनी शेळके, निशा तौष्णीवाल आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमा पूजनाने केली .कार्यकारणभाव आणि चिकित्सा या आधारवर विज्ञान विज्ञान शिकले पाहिजे यामुळे सृष्टीतील कोडी उलगडतील व सत्य म्हणजे विज्ञान याची जाणीव होईल असे संगाई यांनी विचार मांडले .
मुलभूत गरजांच्या पुर्तातेपासून चैनीच्या वस्तू सहज उपलब्धते पर्यंत सगळ्याच गोष्टी विज्ञानामुळे साध्य होतात .हे प्रा. विष्णू जाधाव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .
बहुधा सगळ्याच सृजन भारतीय नागरिकांना राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहित असतात पण फारसं कोणाला हे माहित नसत की वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.आपल्या कडे विज्ञानाची सृष्टी आली आता वैज्ञानिक दृष्टी आणि योग्य प्रकारचे कृतीशील शिक्षण याची गरज आहे ,आणि हे शिक्षण आम्ही आमच्या शाळेतून देण्याचा प्रयत्न करतो आहोत यामुळे विज्ञानयुग येईल असे डॉ. संजय रोडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले .
समाजामध्ये विज्ञानाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व घटक संस्थांनी चांद्रयान २ , क्युरीयस माईन्ड विथ डीस्कव्हरी , कलाम ५ मिसाईल,सोफिया रोबोट, अर्टीफिशिअल इंतेलीगेन्से, हायपर पूल रेल्वे , हंगिंग ब्रिज , मायक्रोस्कोप वर्ल्ड , ग्लोबल वार्मिंग, आदि विषयावर विज्ञान रॅली मध्ये देखावे सादर केले व सेलुवाशियांची दाद मिळवली .विज्ञान दिनाचे औचित्य साधून खासकरून विद्यर्थ्यांसाठी तारांगण शो चे आयोजन केले होते या शो पाहण्यासाठी सेलू , मंठा, पाथरी, मानवत येथील शाळेतील विद्यर्थी तसेच विज्ञान शिक्षकांनी या शो चा लाभ घेतला .
या शोबत वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा , श्रीराम प्रतिष्ठान टालेंट परीक्षा , सांस्कृतिक कार्यक्रम व आदि स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी जुनिअर वैज्ञानिक पारितोषिक मा शिवराज टकले , शैलेजा ढगे या विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच इतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विठ्ठल सरकटे यांनी केले कार्याकार्माचे सूत्रसंचालन वर्षा स्वरूप यांनी केले , या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. नारायण चौरे यांनी केले . या कार्यक्रमासाठी श्रीराम प्रतिष्ठान मधील सर्व घटक संस्थेतील मुख्याध्यापक , सर्व शिक्षक , विज्ञान शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .या कार्याकार्माचे कौतुक सर्व सेलुवाशियानी केले..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें