साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून अजित पवार अचानक मुंबईला रवाना?राजकीय चर्चा रंगली - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 4 मार्च 2018

साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून अजित पवार अचानक मुंबईला रवाना?राजकीय चर्चा रंगली

साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून अजित पवार अचानक मुंबईला रवाना?राजकीय चर्चा रंगली



 प्रतिनिधी
सातारा : साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून आमदार अजित पवार अचानकपणे मुंबईला रवाना झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ही बैठक आयोजित केल्याची माहिती पक्षातील अधिकृत सूत्रांनी पत्रकाराशी बोलताना दिली.
अजित पवार यांच्या सातारा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या दौऱ्यात ते आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ते व स्थानिक नेते मंडळीना मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला.
जिल्हा मध्यवर्ती बंकेच्या सभागृहातील आयोजित कार्यक्रम विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सुनील माने, पारिजात दळवी, बाळासाहेब भिलारे, सभापती मनोज पवार , शिवाजी सर्वगोड, तेजस शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा सुरु झाला.
जिल्ह्यातील पाच नियोजित कार्यक्रम टाळून अजित पवार मुंबईला का गेले? याची चर्चा सुरु झाली आहे.
पण राजकिय चर्चा मात्र जोरात रंगली आहे,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें