नवाज शरीफ यांच्या घराजवळ आत्मघातकी हल्ला, 5 पोलिसांसह 9 जणांचा मृत्यू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 15 मार्च 2018

नवाज शरीफ यांच्या घराजवळ आत्मघातकी हल्ला, 5 पोलिसांसह 9 जणांचा मृत्यू.

नवाज शरीफ यांच्या घराजवळ आत्मघातकी हल्ला, 5 पोलिसांसह 9 जणांचा मृत्यू.

__________________________________


पाकिस्तानच्या लाहोर मध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घराजवळच हा हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात 5 पोलिसांसह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 20 जण जखमी आहेत. हल्लेखोर दहशतवाद्यानं पोलीस चौकीला लक्ष्य करत स्वतःला उडवून दिलं आहे. पोलीस उपमहानिरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यानं रायविंद रोडवरच्या पोलीस चौकीवर निशाणा साधत हा हल्ला केला आहे. आत्मघातकी हल्लेखोरानं मोटारसायकलवरून येत हल्ला केल्याची प्राथमिक माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यानं दिली आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पोलिसांनी एक समितीही बनवली आहे. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, शहीद झालेल्या आमच्या शूर पोलिसांवर आम्हाला गर्व आहे. दहशतवादा विरोधात लढा देणा-या पोलिसांचा देशाला नेहमीच गर्व राहील. जखमींवर शरीफ मेडिकल कॉम्प्लेक्स आणि जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात पाच पोलीस कर्मचारी आहेत, अशी माहिती लाहोरचे पोलीस उपायुक्त हैदर अशरफ यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी घडवून आणलेला हा आत्मघातकी स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज पाच ते सहा किमी अंतरापर्यंतच्या लोकांनी ऐकला. या दहशतवादी हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही. पोलीस स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य राबवत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें