ब्रह्मांडाचे रहस्य शोधक ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांचं निधन
न्यूयॉर्क*: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांचं निधन झालं आहे. कॅंब्रिजमधील राहत्या घरी त्यांचं निधन झालंय. ते ७६ वर्षांचे होते.हॉकिंग्ज यांनी विज्ञान क्षेत्रात मोलाचं काम केलं असून जगभरात त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
हॉकिंग्ज यांच्याकडे १२ सनद पदव्या आहेत. हॉकिंग्ज यांचं कार्य पाहून अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांछ्या 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम' हे अंतराळातील रहस्यांवर आधारीत पुस्तक चांगलंच गाजलं होतं.
१९७४ मध्ये ब्लॅक होल्सवर असाधारण रिसर्च करून त्यांनी धमाका उडवून दिला होता. महत्वाची बाब म्हणजे स्टिफन यांचा मेंदू सोडून त्यांच्या शरीराचं एकही अंग काम करत नव्हतं. स्टिफन हॉकिंग्ज यांनी 'द ग्रॅन्ड डिझाईन', 'यूनिव्हर्स इन नटशेल', 'माय ब्रीफ हिस्ट्री', 'द थेअरी ऑफ एअरीथिंग' अशी पुस्तके लिहिली आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें