- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 2 फ़रवरी 2018

विद्यार्थ्यासाठी बक्षिसांचा वर्षाव

आसडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन रंगले 

सारोळा (प्रतिनिधि.राजु.गवळी): सिल्लोड तालुक्यातील आसडी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे गजानन महाविद्यालयाच्या वतीने ३१(बुधवार) रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गोपीनाथरावजी दौड हे होते.
      बुधवार रोजी पार पडलेल्या गजानन महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या मिनाताई विनोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे सा.पो.निरीक्षक विश्वास पाटील,विद्यालयाचे सचिव साहेबराव अपार,सरपंच शोभाताई सुरडकर,रहिमाबाद येथिल सरपंच अंकुश गाडवे हे होते.
        यावेळी सिल्लोड पोलीस स्टेशनचे सा.पो.निरीक्षक विश्वास पाटील यांनी अशा कार्यक्रमाने विद्यार्थांच्या कलागुणाना वाव मिळते,विद्यार्थांनी अशा कार्यक्रमामध्ये सक्रिय होऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे,असे आव्हान त्यानी केले.  विद्यार्थांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थांनी श्री गणेशाच्या संगीताने केली.  विद्यार्थांनी एकापेक्षा-एक गीतावर नृत्य सादर केले व प्रक्षाकांची मने जिंकल्यामुळे बक्षिसांचा वर्षाव नागरिकांकडुन करण्यात आला होता. 
        यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्टल सुरडकर,ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष अजबराव मिरघे,माजी उपसरपंच फकिराबा सुरडकर,रत्नाकर सुरडकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वावधने सर,भागवत मिरघे,सुभाष नवल व तसेच आसडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो लाईन: नृत्य सादर करताना गजानन महाविद्यालयाचे विद्यार्थी.

Tezznews 24 web news channel.
Contact.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें